राशीभविष्यावर नव्हे,कर्मावर विश्वास ठेवा: ह.भ.प.सिद्धीनाथ मेटे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- स्वतःच्या कर्मावर विश्वास नसलेली हतबल माणसेच राशिभविष्याचा आधार घेतात.वारकरी संप्रदायात सुद्धा राशिभविष्याला स्थान नाही.असे ‘राशिभविष्य’ मुक्त असलेली ‘ग्रामवार्ता एक्सप्रेस’ दिनविशेष दर्शिका सर्वच स्तरांतील नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास युवक प्रबोधन समिती चे संस्थापक ह.भ.प.सिद्धीनाथ मेटे महाराज यांनी व्यक्त केले.

हे पण वाचा :- वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले असे काही…

बोल्हेगाव (अहमदनगर) येथे आयोजित ‘ग्रामवार्ता दिनदर्शिका’ च्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले,’मनुष्याने फक्त कर्म करत राहावे.कर्माप्रमाणे फळ मिळतेच.जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही.

हे पण वाचा :- या कारणामुळे प्राजक्त तनपुरे झाले मंत्री खुद्द शरद पवारांनीच दिले स्पष्टीकरण !

त्यामुळे राशिभविष्य,कर्मकांड यांच्या आहारी न जाता स्वतःच्या मनगटावर,कर्मावर विश्वास ठेवा.त्यासाठी चांगले विचार आत्मसात करा.वैचारिक वाचन करा.हीच वैचारिक वाचनाची पूर्तता करणारी ग्रामवार्ता एक्सप्रेस ची दिनविशेष दर्शिका असून सर्वांच्या आपल्या संग्रही ठेऊन आपल्या प्रियजनांना भेट म्हणून द्यावी,”असे आवाहन त्यांनी केले.

हे पण वाचा :- राष्ट्रवादीचा हा नेता होणार अहमदनगरचा पालकमंत्री ?

ज्येष्ठ कामगार नेते,विचारवंत कॉ. भैरवनाथ वाकळे म्हणाले,”एकविसाव्या शतकातील गतिमान दिनचर्येत वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याची आवश्यकता आहे.योग्य शिक्षण न मिळाल्याने अंधश्रद्धा वाढीस लागत आहे.व शिक्षणाऐवजी नको त्या कारणांसाठी लोकांचा पैसा खर्च होत आहे.ग्रामवार्ता दिनविशेष दर्शिका मधून अनेक प्रेरणादायी व्यक्तींची ओळख होईल,त्यांना नक्की अभ्यासा.विविध प्रकारचे लेख ही प्रबोधनपर ठरतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे पण वाचा :- आमदार निलेश लंके म्हणाले मंत्रिपदापेक्षा ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची !

प्रास्तविक करताना ग्रामवार्ता दिनविशेष दर्शिका चे संपादक संतोष शिंदे म्हणाले,’सदर दिनविशेष दर्शिके मध्ये जागतिक, राष्ट्रीय स्तरावर व महाराष्ट्रा मध्ये साजरे होणारे विविध दिनविशेष व महापुरुष, क्रांतिकारक, समाजसेवक, साहित्यिक, संत,विविध क्षेत्रातील नामवंत,कर्तृत्ववान व्यक्तींचे जन्मदिन (जयंती,पुण्यतिथी) यांची नोंद घेतलेली आहे.स्पर्धा-परीक्षार्थी,विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक व पत्रकार अशा सर्वांना मार्गदर्शक ठरेल अशी ही दिनदर्शिका आहे.”

हे पण वाचा :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक सरपंचाचे पद अखेर रद्द

याप्रसंगी सचिन चोभे, महादेव गवळी,अ‍ॅड.योगेश गेरंगे यांनी मनोगत व्यक्त केले.डॉ.बी.एम.शिंदे,लोकरंग च्या संचालक माधुरी चोभे, दगडवाडी च्या सरपंच स्वाती सचिन शिंदे, तेजस शेलार,तुषार वाघमारे, अजिंक्य दंडवते,कॉ. दीपक शिरसाठ प्रमुख उपस्थित होते.

हे पण वाचा :- खासदार सुजय विखे म्हणाले ‘विखे पॅटर्न’ संपलेला नाही !

अमोल शिंदे,विनोद सूर्यवंशी,पंकज नाईकवाडे,अमोल गाडगे,निखिल म्हस्के आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.प्रा.मच्छिंद्रनाथ म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले तर ह.भ.प.संतोष वाघ महाराज यांनी आभार मानले.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : सावेडीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अड्डाच्या पर्दाफाश

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment