Ahmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingMaharashtra

तेरी भी चुप मेरी भी चुप अशी भूमिका योग्य नव्हे – खा.डॉ.सुजय विखे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;-  कुकडीच्या आवर्तनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक नागपूर येथे घेतली. २०१६ च्या शासन निर्देशानुसार लोकसभा सदस्य या समितीचा सदस्य आहे. मात्र, या बैठकीचे निमंत्रण आपल्याला मिळाले नाही. पाच लोक बसून पाच लाख लोकांसाठी महत्वाचा असलेला निर्णय घेऊ शकत नाहीत. कुकडीच्या प्रश्नात पक्षीय राजकारण नको. आज पावेतो कुकडीचे नियोजन योग्य पद्धतीने झाले नाही.

हे पण वाचा :- या कारणामुळे प्राजक्त तनपुरे झाले मंत्री खुद्द शरद पवारांनीच दिले स्पष्टीकरण !

कालव्यांची दुरुस्ती व वहन क्षमता न वाढवल्यानेच कुकडीचे समस्या जैसे थे आहे सर्वांना सोबत घेत कुकडीसाठी नवी सुरुवात आपण करीत आहोत. शासकीय यंत्रणेसोबत आपली यंत्रणा मदतीला दिली जाईल. आवश्­यक साधने पुरवली जातील.आज पावेतो जे झाले नाही ते करून दाखवू. या शब्दात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मिशन कुकडी आवर्तनाची घोषणा केली.

हे पण वाचा :- राष्ट्रवादीचा हा नेता होणार अहमदनगरचा पालकमंत्री ?

गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात कुकडीआवर्तनाच्या नियोजनासंदर्भात खा.डॉ. सुजय विखे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे, प्रशांत कडूसकर, आर.के. जगताप, नायब तहसीलदार अभिजित वांढेकर, आपत्ती व्यवस्थापक डॉ. वीरेंद्र बडदे, आदींसह कुकडी लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.

हे पण वाचा :- आमदार निलेश लंके म्हणाले मंत्रिपदापेक्षा ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची !

बैठकीच्या सुरवातीला खा.विखे यांच्या सूचनेवरून उपस्थितांनी जि.प.चे माजी अध्यक्ष स्व.रामनाथ वाघ यांच्या स्मृतीस अभिवादन केले. या बैठकीस पारनेर, श्रीगोंदे, कर्जत तालुक्­यातील प्रतिनिधींनी कुकडी संदर्भातील आपली भावना सभागृहासमोर मांडली. खा.विखे म्हणाले, कुकडी संदर्भात श्रेय घ्यावे, हा आपला राजकीय हेतू नाही.

हे पण वाचा :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक सरपंचाचे पद अखेर रद्द

प्रकल्प शेतकऱ्यांसाठी आहे. मात्र, वर्षांनुवर्ष ज्यांच्यासाठी कुकडी त्यांची पाण्यासाठी ओरड कायम आहे. आजपर्यंत कुकडीसंदर्भात योग्य नियोजन झाले नाही.पक्षीय मतभेद निवडणुकीत जरूर राहू द्या. मात्र, कालव्याच्या आवर्तनात मतभेद कशाला हवेत.निष्कर्ष निघाला नाही तर बैठकांचा काय उपयोग आहे.

हे पण वाचा :- खासदार सुजय विखे म्हणाले ‘विखे पॅटर्न’ संपलेला नाही !

कुकडी कशासाठी, कुणासाठी याचा विचार सर्वांनी गांभीर्यानी करावा. खासदार विखेंची टोलेबाजी नेमकं कुकडीचे पाणी आहे किती आणि नगरला मिळतं किती, याचा हिशेब घ्यावाच लागेल. पुणे जिल्ह्यात किती पाणी मुरतयं याचा शोध आपण घेऊ. प्रकल्पाचे नियोजन करताना तेरी भी चुप मेरी भी चुप अशी भूमिका योग्य नव्हे.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : सावेडीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अड्डाच्या पर्दाफाश

महाविकास आघाडीच्या भूमिकेबाबत टीकास्त्र सोडताना ते म्हणाले, सरकार स्थापन करण्याला दोन, विस्ताराला एक महिना गेला. आता खाते वाटप कधी होईल ? कुकडीचा विषय जलसंपदा मंत्र्याच्या अखत्यारित असतो. पण जलसंपदामंत्री कोण, हेच निश्­चित नाही. मंत्री निश्­चित झाले की कुकडीचा पाठपुरावा आपण त्यांच्याकडे जरूर करू.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button