Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingMaharashtra

पाणीप्रश्न कायस्वरूपी सुटावा या मागणीसाठी मंत्रीपदाला लाथ मारली – आमदार निलेश लंके

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- अनेक वर्षांपासून पारनेरसह तालुक्याचा पाणीप्रश्न प्रलंबित आहे. महाविकास आघाडीच्या सरकारध्ये मंत्रीत्रीपदाची संधी मिळाली असती, परंतु पारनेरचा पाणीप्रश्न कायस्वरूपी सुटावा. या मागणीसाठी आपण मंत्रीपदाला लाथ मारली. असे मत आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले. आपल्या आमदारकीच्या काळात पारनेरचा पाणीप्रश्न कायस्वरूपी सोडविणार असल्याचेही ते म्हणाले.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात दगड टाकून तरुणाचा खून

यावेळी पारनेर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला. त्यात श्रीमंदीलकर, श्रीकृष्ण दीक्षित (शंकु), लक्ष्मन बोरुडे मिस्तरी, दशरथ सोनवणे यांच्या मातोश्री, ग्रापंचायतची निवृत्त महिला कर्मचारी शांताबाई सोनवणे व भामाबाई सातपुते, समाजप्रबोधनकार रामदास थोरात, महिला पारिचारिका परदेशी ताई, पुजारी बन्सीभाऊ विधाटे, लढवय्या नागरिक भगवानराव तांबे, सुशीला फंड, तसेच वृद्ध माता-पित्यांचा सत्कार केला.

हे पण वाचा :- कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नगर मध्ये येत शंकरराव गडाख यांनी केले हे काम !

या कार्यक्राच्या व्यासपीठावर शहरातील वृद्ध मार्गदर्शकांना आमंत्रित केले होते. त्यात देशाने गुरुजी, गांधी सर, दत्तात्रय शिंदे, आयुब शेख, बाळासाहेब पवळे, धुकर सोनवणे, दादाभाऊ औटी, एकनाथ चेडे, पै.भीमा पठारे, नामदेव पठारे, बबन व्यवहारे, किसनराव पठारे, शंकर शिंदे, सुभाष मते, बाळासाहेब मते, सखाराम कावरे, बाबा कुलट, नामदेव कावरे, बबन चौरेआदींचा सन्मान केला. आमदार झाल्यानंतर प्रथमच पारनेर शहरात या सोहळ्याचे आयोजन केले होते.

हे पण वाचा :- नगरच्या युवक- युवतींना चिंता फक्त जोडीदाराची,करिअरपेक्षा रिलेशनशीपला अधिक महत्व 

शहरवा सीयांनीही सामान्य व्यक्तित्त्वाचा सत्कार करण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची अध्यक्षीय निवड श्रीकांत चौरे यांनी केली, तर बाळासाहेब नगरे यांनी अनुमोदन दिले.पारनेरच्या ज्वलंत समस्याची सोडवणूक करण्यासाठी आमदार लंके यांना विनंती केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तुकाराम ते तर कार्याध्यक्ष अ‍ॅड.पी.आर.कावरे हे होते. आ.लंके यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले व शहराच्या मुलभूत समस्या सोडवण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : सावेडीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अड्डाच्या पर्दाफाश

पारनेरच्या विकासाचा ठोस अजेंडा तयार करून पाच वर्षासाठी आराखडा तयार करावा. पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी जुन्या कामाच्या चौकशा करण्यापेक्षा नवीन विधायक विषयावर चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक लावावी लागेल. असेही आ.लंके यांनी सांगितले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button