Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingMaharashtra

महाराजावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, त्याने मागितली ५ लाखाची खंडणी !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- श्रीरामपूर तालुक्यातील एका धार्मिकस्थळावर काही दिवसांपूर्वी मठाधिपती म्हणून नेमणूक झालेल्या तुकाराम ‘ ( नाव बदललेले ) महाराज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या इसमावर आळंदी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून दुसरीकडे एका गोरख ‘ ( नाव बदललेले ) नावाच्या इसमाने ‘ महाराजा ‘ कडे ३ ते ५ लाख रुपये खंडणी मागितल्याचे संबंधित तुकाराम ‘ यांनी म्हटले आहे. 

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात दगड टाकून तरुणाचा खून

याप्रकरणी आळंदी पोलीस खंडणी मागणी तक्रार अर्जाचा तपास करत असल्याचे तेथील पोलीस निरीक्षकांनी म्हटले आहे . दरम्यान वारकरी संप्रदायात खळबळ उडवून देणाऱ्या या ‘ पाखंडी ‘ महाराजाच्या प्रकाराने ‘ गोरखच्या कुटण्याने चर्चेला तोंड फुटले आहे . ‘ गोरख नावाचा व्यक्ती आळंदी येथील एका धर्म – आश्रमशाळेच्या संबंधित महाराजाला भेटून त्यांना अनाथ मुलांसाठी खोल्या भाड्याने मागितल्या. 

हे पण वाचा :- कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नगर मध्ये येत शंकरराव गडाख यांनी केले हे काम !

त्यात गोरख काही मुले आणून ठेवली. नंतर तेथे काही महिलाही आणून ठेवल्या . हा प्रकार लक्षात आल्याने सज्जन ‘ महाराजाने खोली खाली करण्यास सांगितले तेव्हा खोली खाली करायची असेल तर मला ५ लाख रुपये द्या , अशी ‘सज्जन ‘ महाराजाकडे खंडणीची मागणी केली . तशी तक्रार आळंदी पोलिसांत देण्यात आली . तर ३५४ विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या ‘ तुकाराम ‘ या महाराजाने वृत्तवाहिनीशी बोलताना संगितले.

हे पण वाचा :- नगरच्या युवक- युवतींना चिंता फक्त जोडीदाराची,करिअरपेक्षा रिलेशनशीपला अधिक महत्व 

गोरख ‘ हा वारकरी संप्रदायाला बदनाम करीत आहे . माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केल्या . ३५४ विनयभंगाचा गुन्हा दाखल केला . ३ लाख व ५ लाख अशी खंडणी मागत ‘ गोरख ‘ याने महिलेस पुन्हा विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला लावील , अशी धमकी दिली.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : सावेडीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अड्डाच्या पर्दाफाश

त्याच्याकडे चार – पाच महिला अशा कामासाठी तयार असल्याचा आरोप ‘ तुकाराम’ यांनी केला . पोलिसांत तक्रार दिल्याचे त्यांनी सांगितले . राजकीय संघटनांचे नाव सांगून खंडणी , ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार ‘ गोरख ‘ करतो , असेही म्हटले आहे . दरम्यान आळंदी पोलिसांशी संपर्कसाधला असता तांत्रिक कारणामुळे दुपारी संपर्क होवू शकला नाही.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग ; पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या त्रासातून तरुणाचा गळफास

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button