Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingMaharashtra

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर ! जाणून घ्या कोण आहेत अहमदनगरचे पालकमंत्री ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर बरेच दिवस चाललेल्या घोळानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला.

त्यानंतर अखेर मंत्रिमंडळ विस्तारात ३६ मंत्र्यांनी शपथ घेतली आणि खातेवाटपही झाले. परंतु, पालकमंत्री पदाचे वाटप मात्र झाले नव्हते.

अखेर आज संध्याकाळी महाविकास आघाडीच्या पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर झाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्यासह गडचिरोलीची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आली आहे.

दिलीप वळसे पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री असतील. अकोल्याचे पालकमंत्री म्हणून बच्चू कडू यांची नियुक्ती केली आहे.

राज्यातील 36 जिल्ह्याचे पालकमंत्री 

1. पुणे- अजित अनंतराव पवार
2. मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख
3. मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे
4. ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे
5. रायगड – आदिती सुनिल तटकरे
6. रत्नागिरी-  अनिल दत्तात्रय परब
7. सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत
8. पालघर- दादाजी दगडू भुसे
9. नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ
10. धुळे- अब्दुल नबी सत्तार
11. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
12. जळगाव-  गुलाबराव रघुनाथ पाटील
13. अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ
14. सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
15. सांगली- जयंत राजाराम पाटील
16. सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
17. कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
18. औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई
19. जालना- राजेश अंकुशराव टोपे
20. परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
21. हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड
22. बीड- धनंजय पंडितराव मुंडे
23. नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण
24. उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख
25. लातूर- अमित विलासराव देशमुख
26. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
27. अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
28. वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई
29. बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
30. यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड
31. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
32. वर्धा- सुनिल छत्रपाल केदार
33. भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
34. गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख
35. चंद्रपूर-  विजय नामदेवराव वडेट्टीवार
36. गडचिरोली-  एकनाथ संभाजी शिंदे

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button