सासरच्या छळाला कंटाळून आईची चिमुकलीसह आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- दुचाकीचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून ५०हजार रुपये आण. असे म्हणून सतत होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून तालुक्यातील कोरेगव्हाण येथील सुमन उर्फ मीना गणेश आढाव (वय ३०) या विवाहितेने मुलीसह विहिरीत उडी घेवून आपली व मुलीची जीवनयात्रा संपवली.

ही धक्कादायक घटना रविवार दि.५जानेवारी रोजी सायंकाळी चार ते सोमवार दि.६रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. सासरच्या छळाला कंटाळून आईने मुलीसह केलेल्या आत्महत्येच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सदर घटनेप्रकरणी मयताचा भाऊ दादासाहेब फक्कड वाळके (रा.उखलगाव) यांच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयत मीना हिचा पती गणेश परसराम आढाव व सासरा परसराम लक्ष्मण आढाव या दोघांविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेबाबत माहिती अशी की, मयत मीना या त्यांच्या कोरेगव्हाण येथे सासरी नांदत असताना त्यांना त्यांचे पती व सासरे हे दोघेही दुचाकीचे झालेले कर्ज फेडायचे असून, त्यासाठी लागणारे ५०हजार रुपये तू तुझ्या माहेराहून आन, असे म्हणून मयत मीना यांना सतत त्रास देऊन त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करत होते.

तसेच मयत मीना यांना हे पैसे माहेराहून आणावेत यासाठी मारहाण, शिवीगाळ करत होते. या सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून मयत मीना यांनी आपली सहा वर्षांची चिमुरडी अनुजा हिच्यासह घरापाठीमागे असणाऱ्या विहिरीच्या पाण्यात उडी घेत आत्महत्या केली.

सोमवार दि.६रोजी जेव्हा मयत मुलगी आणि तिच्या आईचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. तेव्हा संताप अनावर झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी पती व सासरा या दोघांना चांगलाच चोप दिला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या दोघांना ताब्यात घेतले, रात्री उशिरा मुलीच्या माहेरी उख्खलगाव येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment