अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर घरात बलात्कार ! नातेवाईकांनी दिली मुलीलाच जिवे ठार मारण्याची धमकी …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात बलात्काराच्या घटना सुरुच आहेत यात घट तर नाहीच मात्र, वाढच होताना दिसत आहे. कायद्याचा धाकही नसल्याचं या घटनांमधून वारंवार समोर येत आहे.
अल्पवयीन मुलीवर नात्यातीलच एकाने बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी नेवासा तालुक्यातील मोरेचिंचोरे परिसरात राहणान्या एका घरात १३ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर अमिष दाखवून बळजबरीने अत्याचार केला.
दरम्यान बलात्कार झाल्याची मुलीने तक्रार केल्यानंतर या पिडीतेला नातेवाईकांनीच धमकावले आहे, आरोपींनी सदर अल्पवयीन मुलीलाच जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी पिडीत १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने सोनई पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी विकास फुलसिंग भोसले , रवि फुलसिंग भोसले , सचिन फुलसिंग भोसले,
समीर फुलसिंग भोसले , फुलसिंग सुरतमल भोसले , अंगुरबाई फुलसिंग भोसले सर्व रा . मोरेचिंचोरे . ता . नेवासा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.