विद्यार्थिनीचा विनयभंग करत भावास बेदम मारहाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील एक वय १८ ही विद्यार्थिनी तसेच तिचा भाऊ या दोघांना चौधा जणांनी लोखंडी रॉड व लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करून जखमी केले.

तसेच विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला. जखमीवर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विद्यार्थिनीने श्रीरामपूर तालुका पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन मारहाण करणारे आरोपी किरण रामदास लष्करे , पवन उपळकर , विशाल धनवटे , विशाल गुंजाळ व इतर २० ते ३० लोक सर्व रा . नाऊर, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने नाऊरसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment