Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingMaharashtra

स्वीकृत नगरसेवक पदावरून अहमदनगर शहर भाजपात ‘आर्थिक’ वाद !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर महानगर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावरून अहमदनगर शहर भाजपात चांगलेच वाद झाल्याचे समोर आले आहे. पक्षाकडून एक नाव आले, अन् स्वतःच्या अधिकारातच महापालिकेच्या दोन पदाधिकार्‍यांनी दुसर्‍याचाच अर्ज दाखल केल्याने भाजपमध्ये चांगलीच रणधुमाळी निर्माण झाली.

हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले….

रात्री उशिरापर्यंत बैठका, झापाझापी, नंतर चुकल्याचे मान्य करत झाले गेले विसरून जाण्यासाठी केलेली विनवणी असे अनेक प्रकार घडले. अहमदनगर शहरात दिवसभर चर्चा होती. महापालिकेत स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी शुक्रवारी विशेष सभा घेण्यात आली. या पदावर कोणाला संधी द्यायची, याबाबत विविध पक्षांच्या त्यांच्या अंतर्गत बैठका होत्या.

हे पण वाचा :- पत्रिका नसली, तरी लग्नाला जा…हरिभाऊ बागडे यांचा अहमदनगरच्या भाजप कार्यकर्त्यांना सल्ला !

भाजपमध्ये मात्र अशी बैठक घडून येऊ नये, यासाठीच जोरदार प्रयत्न झाले. या पदासाठी प्रामुख्याने माजी नगरसेवक किशोर डागवाले, किशोर बोरा यांची नावे चर्चेत होती. हे दोघेही शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांचे खंदे समर्थक असल्याने त्यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. महापालिकेतील भाजपच्या संख्येनुसार एकाचीच निवड होऊ शकणार होती.

हे पण वाचा :- माजी आमदार शिवाजी कर्डिले नाही होणार भाजपचे जिल्हाध्यक्ष !

कोणाला संधी द्यायची, यावर स्थानिक तसेच प्रदेश पातळीवरही चर्चा झाल्याचे समजते. त्यानुसार डागवाले यांच्या नावाला हिरवा कंदील मिळाल्याचे सांगण्यात येते. डागवाले गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत महापालिका कार्यालयात अर्ज व त्यासोबतची आवश्यक कागदपत्रे दाखल करण्यासाठी तळ ठोकून होते. मात्र गटनेत्याची सही नसल्याने त्यांना अर्ज दाखल करता आला नाही.

हे पण वाचा :- अल्पवयीन मुलीवर घरात बलात्कार ! नातेवाईकांनी दिली मुलीलाच जिवे ठार मारण्याची धमकी …

अखेर अर्ज न दाखल करताच त्यांना निघून जावे लागले. एकीकडे हे घडत असतानाच दुसरीकडे भाजपकडून रामदास आंधळे यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यासाठी महापालिकेतील दोन पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेतला. या पुढाकारामागे ‘वेगळी’ चर्चा होती.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : आमदार निलेश लंकेंच्या गावात तरुणाचा खून

पक्षाने सुचविलेल्याचा अर्ज दाखल न झाल्याचे समजताच प्रदेशसह स्थानिक नेते संतापले. रात्री उशिरा नेत्याच्या बंगल्यावर बैठका सुरू झाल्या. जे झाले ते चुकीचे कसे आहे, यावर चर्चा झाली. ज्यांनी परस्पर अर्ज दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला, ते सुरुवातीला फोन स्वीकारण्यासही तयार नव्हते.

हे पण वाचा :- महिलेला झाले तिच्या ड्रायव्हरवर प्रेम, मुलांसमोरच केला ड्रायव्हरसोबत सेक्स !

ज्यावेळी फोन घेतला, त्यावेळी प्रदेश नेत्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचे महापालिकेतील या पदाधिकार्‍याने स्थानिक नेत्यांना सांगितले. मात्र त्याचवेळी कॉन्फरन्सवर दुसर्‍या बाजूने तो प्रदेश नेता हे सर्व ऐकत होता. त्यांनी लगेच आक्षेप घेत संबंधितास झापले.

हे पण वाचा :- हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश …बॉलिवूड अभिनेत्रींना अटक !

त्यामुळे सगळा खेळ उघडा पडला. मोठ्या आर्थिक व्यवहारातून हे नाव पुढे आल्याची आज दिवसभर चर्चा होती. रात्री महापालिकेतील संबंधित पदाधिकार्‍यास बोलावून घेऊन चांगलीच कानउघाडणी केली. त्यांनीही झाले ते चुकले, असे मान्य करत एका नेत्याचे पाय धरल्याचेही सांगितले जाते.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close