Ahmednagar SouthBreakingMaharashtra

दोन लाखांच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांची कर्जमाफी केली आहे. हे करत असताना एकाही शेतकऱ्याला रांगेत उभे राहून फॉर्म भरण्याची गरज पडली नाही. दोन लाखांच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचाही प्रश्न सुटणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

संगमनेर येथील मालपाणी लॉन्समध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने प्रगतशील शेतकरी व आदर्श गोपालक पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता.  यावेळी ना. थोरात बोलत होते.

यावेळी मंचावर आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्रीताई घुले, कृषी व पशु संवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, थोरात कारखान्याचे चेअरमन ॲड. माधवराव कानवडे, व्हा.चेअरमन भाऊसाहेब कुटे, कैलास वाकचौरे, विनायक चव्हाण आदी उपस्थित होते.

ना. थोरात म्हणाले, मागील वर्षी सर्वसामान्य शेतकरी दुष्काळाने होरपळला होता. त्यातून सावरल्यानंतर पुन्हा अतिवृष्टीचे संकट एका मागून एक आलेल्या संकटांमुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला होता. त्यामुळे शेती हा धर्म आहे. अशा पद्धतीने बळीराजा काम करत आहे. म्हणून पुढच्या कालखंडात शेतकरी सुखी झाला पाहिजे.

यासाठी आमचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांची कर्जमाफी केली आहे. त्यासाठी एकाही शेतकऱ्याला रांगेत किंवा फॉर्म भरण्याची गरज पडली नाही, तरीही अजून शेतकऱ्यांचे प्रश्न शिल्लक राहिले आहेत.

त्यानंतर दोन लाखांच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचाही प्रश्न सुटणार आहे. त्याचबरोबर जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत, त्यांचाही विचार करण्यात येणार आहे; मात्र सरकार तरी किती वेळा कर्जमाफी करणार.

यामध्ये शाश्वत उपाय योजणे गरजेचे आहे. त्यावर राज्य सरकार काम करणार असून पुढच्या काळात हे काम करण्यात येईल. दुधाच्या व्यवसायातही खूप अडीअडचणी असून कष्टही आहेत.

ज्या देशात अन्न धान्य परदेशातून आणावे लागत होते. आज हा देश अन्न धान्याच्या बाबतीच स्वयंपूर्ण बनला आहे. यामध्ये आपल्या सर्वांचे मोठे योगदान आहे. शेतीचा काळ बदलत गेला. मोठ्या प्रमाणावर उत्पादने सुरु झाली. आज दुध उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

हे पण वाचा :- डोळ्यांना दिसतील अशीच कामे करायचीत रोहित पवारांची राम शिंदे यांच्यावर टीका !

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close