नातेवाईकाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून फोडले डोके

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासा : नेवासा बु. येथे राहणारे अशोक बहिरू तोडमल, वय ३१ या तरुणास घर बांधकाम करु नको, असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली व डोक्यात कुऱ्हाड व लाकडी दांड्याने मारहाण करुन डोके फोडले.

जखमी अशोक बहिरु तोडमल या तरुणाने नेवासा पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी बहिरु सयाजी तोडमल, संदीप बहिरु तोडमल, दोघे रा. नेवासा बु. यांच्याविरुद्ध भादवि कलम ३२४,  ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

10 जानेवारी रोजी ६ वा.  ही मारहाण करण्यात आली.  आरोपी हे फिर्यादीचे वडील व भाऊ असे नातेवाईक आहेत. पोलिस  पुढील तपास करीत असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे पण वाचा :- डोळ्यांना दिसतील अशीच कामे करायचीत रोहित पवारांची राम शिंदे यांच्यावर टीका !

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment