Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingMaharashtra

पाणीदार आमदार शंकरराव गडाख झाले नामदार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महाराष्ट्राला पाणीदार आमदार म्हणुन ओळख असलेले आ.शंकरराव गडाख यांची नुकतीच महाआघाडीचे ठाकरे सरकारमध्ये नामदार म्हणुन वर्णी लागली. ना.शंकरराव गडाख यांचा राजकिय प्रवेश मुळा सहकारी साखर कारखान्याच्या १९९४ ते २००५ या काळात चेअरमनपदापासून झाला.

हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले….

या कालावधीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याला व्हि.एस.आय या संस्थेचा सलग दोन वर्ष उत्कृ ष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार मिळाला. अतिशय काटकसर करून ३० मेगावॅट क्षमतेचा विज प्रल्कप त्यांनी एका वर्षात पुर्ण केला. डिसेंबर २००७ ते २००८ या कालावधीत अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना शेती, शिक्षण व महिला बचत गटांच्या बाबतीत पुढाकार घेऊन निर्णय घेतला.

हे पण वाचा :- पत्रिका नसली, तरी लग्नाला जा…हरिभाऊ बागडे यांचा अहमदनगरच्या भाजप कार्यकर्त्यांना सल्ला !

राज्यात गाजला शंकरराव गडाख बंधारे पॅटर्न २०१३ मध्ये दुष्काळ परिस्थितीत १५५ साठवण बंधारे,१४५ साखळी बंधारे,२३ गावतळे व १७ पाझर तालावाचे खोलीकरण,रूंदीकरण करून पुर्ण केले.या पॅटर्नने जिल्ह्यासह राज्याचे लक्ष वेधले होते.

हे पण वाचा :- अल्पवयीन मुलीवर घरात बलात्कार ! नातेवाईकांनी दिली मुलीलाच जिवे ठार मारण्याची धमकी …

मुळा कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी १९९७ मध्ये मुळा सहकारी बॅँकेची स्थापना करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा दिला. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर मुळा मध्यवर्ती सहकारी ग्राहक या संस्थेची सोनई येथे सन २००० मध्ये स्थापना केली.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : आमदार निलेश लंकेंच्या गावात तरुणाचा खून

शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी सन २००० मध्ये नेवासा तालुका सह. दुधची निर्मिती केली.मा.खा.यशवंतराव गडाख यांनी उभा केलेल्या मुळा एज्युकेशन संस्थाचे प्रशांत गडाख यांच्या सहकार्याने वटवृक्षात रूपांतर करून गोरगरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय केली. घोडेगाव येथे शेतकऱ्यांसाठी कांदा मार्केटची सोय केली.

हे पण वाचा :- महिलेला झाले तिच्या ड्रायव्हरवर प्रेम, मुलांसमोरच केला ड्रायव्हरसोबत सेक्स !

सत्तेत असतानाही पाट पाण्यासाठी सरकार विरोधात उपोषण करून पाणी मिळवले व बंधारे भरून घेतले.पांढरीपुल एम.आय.डी.सी. चालू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.सौ.सुनिताताई गडाख यांच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वाधिक महिला बचत गट स्थापन करून महिलांचा आर्थिक स्तर उंचावला.

हे पण वाचा :- डोळ्यांना दिसतील अशीच कामे करायचीत रोहित पवारांची राम शिंदे यांच्यावर टीका !

२०१४ च्या विधानसभेत पराभूत होऊनही खचुन न जाता तसेच कोणतेही पद नसताना शेतकरी व सर्वसामान्यांसाठी पाणी प्रश्नावर आंदोलन छेडले. प्रसंगी तुरुंगावास भोगला. क्रांतीकारी शेतकरी पक्षाची स्थापना करून धाडसी राजकिय निर्णय घेतला.जिल्हा परिषद निवडणुकीत ७ पैकी ५ व पंचायत समितीच्या १४ पैकी १२ जागा या पक्षाने जिंकल्या.

हे पण वाचा :- हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश …बॉलिवूड अभिनेत्रींना अटक !

या विजयामुळे भाजप तालुक्यात खिळखिळी होण्यास सुरवात झाली. इतर जिल्ह्यात कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत होते परंतू नेवासा तालुक्यात मात्र भाजपसह अन्य कार्यकर्ते क्रांतीकारी पक्षात प्रवेश व करीत होते.त्यामुळेच ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत सुमारे ३० हजारांहून अधिक मताधिक्क्याने विजयी होऊन आमदार शंकरराव गडाख हे नामदार झाले.

हे पण वाचा :- पुण्याच्या तरुणाने अहमदनगरमधून व्यापाऱ्याच्या मुलीस पळविले

जिल्ह्याचे जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांना त्यांच्या राजकीय कारकीर्दीत मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली नाही. परंतु शंकरराव गडाख यांच्या रूपाने मा.खा.गडाख यांचे ते स्वप्न पुर्ण झाले.

हे पण वाचा :- ब्रेकिंग न्यूज : अहमदनगर शहरात राजकीय भूकंप !

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button