जिल्हा परिषेदतील राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषेदतील राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन करण्यात आला आहे. यामध्ये मोहिते-पाटील कुटुंबातील दोन सदस्यांसह सहा जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे.

या जिल्हा परिषद सदस्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान न करता भाजप आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं. यामुळे पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत या सहा सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी 31 डिसेंबरला मतदान झाले होते. यात पुरेसे संख्याबळ असताना सुद्धा राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला होत. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 6 सदस्यांनी विरोधी गटाला मतदान केले होते.

सहा सदस्यांनी विरोधी गटाला मतदान केल्याने राष्ट्रवादी आणि महाविकासआघाडीचा प्रयत्न फसला. जिल्हा परिषदेतील मतदानात या सहा सदस्यांनी भाजप आणि महाविकासआघाडीच्या उमेदवाराला मतदान केले.

निलंबित केलेले सर्व सहा सदस्य हे माळशिरस तालुक्यातील असून स्वरूपाराणी मोहिते,  शीतलदेवी धैर्यशील मोहिते, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले, अरुण तोडकर, गणेश पाटील या सदस्यांचा यात समावेश आहे.

हे पण वाचा :- डोळ्यांना दिसतील अशीच कामे करायचीत रोहित पवारांची राम शिंदे यांच्यावर टीका !

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment