Connect with us

Ahmednagar City

अखेर अहमदनगर भाजप जिल्हाध्यक्षांची निवड झाली ! नावे वाचून तुम्हालाही धक्का बसेल …

Published

on

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या अहमदनगर भाजप जिल्हाध्यक्षांची अखेर आज निवड झाली आहे.

हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले….

भाजपच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी अरुण मुंढे, उत्तर जिल्हाध्यक्ष पदी राजेंद्र गोंदकर, शहर जिल्हाध्यक्ष पदी नगरसेवक महेंद्र उर्फ भैय्या गंधे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

हे पण वाचा :- पत्रिका नसली, तरी लग्नाला जा…हरिभाऊ बागडे यांचा अहमदनगरच्या भाजप कार्यकर्त्यांना सल्ला !

जिल्ह्यातील उत्तर, दक्षिण आणि शहर जिल्हाध्यक्ष पदांसाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने या पदाच्या निवडीचा चेंडू श्रेंष्ठीच्या कोर्टात ढकलण्यात आला होता.

हे पण वाचा :- अल्पवयीन मुलीवर घरात बलात्कार ! नातेवाईकांनी दिली मुलीलाच जिवे ठार मारण्याची धमकी …

अहमदनगर येथे तीन दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदाकरता ३९ इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हरिभाऊ बागडे यांनी काम पाहिले होते.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : आमदार निलेश लंकेंच्या गावात तरुणाचा खून

आजी, माजी जिल्हाध्यक्ष सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे होते. यावेळी भाजपचे नगर जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची नगर शहर व दक्षिण, उत्तर अशी विभागणी केली आहे.

हे पण वाचा :- महिलेला झाले तिच्या ड्रायव्हरवर प्रेम, मुलांसमोरच केला ड्रायव्हरसोबत सेक्स !

महानगरपालिका क्षेत्रासाठी शहराध्यक्षपद स्वतंत्र आहे. ग्रामीण भागाकडे दोन जिल्हाध्यक्ष यावेळेला पक्षाने दिले आहेत. महेंद्र उर्फ भैय्या गंधे हे विद्यमान नगरसेवक असून अरुण मुंडे हे भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत.

हे पण वाचा :- डोळ्यांना दिसतील अशीच कामे करायचीत रोहित पवारांची राम शिंदे यांच्यावर टीका !

दरम्यान, दक्षिणेसाठी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या नावाची चर्चा होती. पण त्यांनी स्वतः नकार दिला. प्रा. भानुदास बेरड यांची चांगली कामगिरी झाल्याने त्यांना प्रदेश कार्यकारिणीत घेण्याचे ठरविण्यात आल्याचे समजते.

हे पण वाचा : मुंबईत सेक्स रॅकेटमध्ये अटक झाल्यानंतर अभिनेत्री म्हणाली हे तर ….

तसेच उत्तरेसाठी नेवाशाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तयारी दर्शविली होती. एवढेच नव्हेतर त्यांनी मुलाखतही दिली होती. मात्र आता त्यांनी माघार घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये ट्रकने महिलेला चिरडले !

नगर दक्षिण, नगर उत्तर आणि नगर शहर (महानगर) असे तीन जिल्हाध्यक्ष निवडीसाठी नगरमध्ये शुक्रवारी भाजपची बैठक झाली. यावेळी निवडणूक निरीक्षक हरिभाऊ बागडे यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते, आमदार उपस्थित होते.

हे पण वाचा :- पुण्याच्या तरुणाने अहमदनगरमधून व्यापाऱ्याच्या मुलीस पळविले

यावेळी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पण स्थानिक पातळीवर एकमत न झाल्याने जिल्ह्यातील तिनही जिल्हाध्यक्षांच्या निवडी प्रदेश कार्यालयातून होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

हे पण वाचा :- किरकोळ वादातून जन्मदात्या आईची हत्या, मृतदेहाचे तीन तुकडे करून साजरा केला थर्टी फस्ट !

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Most Popular

error: Content is protected !!