कुत्र्यामुळे कोट्यवधी रुपये लंपास करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शेवगाव तालुक्यातील बोधेगावच्या हुंडेकरीनगरमधील सेंट्रल बँकेच्या एटीएमचे शटर गॅसकटरने कापून रोकड लंपास करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न बँकेचा सायबर विभाग, पोलिस, ग्रामस्थ व जागामालकाच्या जागरूकतेमुळे फसला.

हे पण वाचा :- महिलेला झाले तिच्या ड्रायव्हरवर प्रेम, मुलांसमोरच केला ड्रायव्हरसोबत सेक्स !

ग्रामस्थ येत असल्याची चाहूल लागताच साहित्य जागेवरच टाकून चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. रविवारी पहाटे बँकेच्या शटरला चोरट्यांनी गॅसकटरने छिद्र पाडले.

हे पण वाचा :- पुण्याच्या तरुणाने अहमदनगरमधून व्यापाऱ्याच्या मुलीस पळविले

त्यातून एका चोराने आत प्रवेश करून एटीएमला जोडलेली वायर तोडत रोकड ठेवलेले मशीन कापण्याचा प्रयत्न सुरू केला. हा प्रकार बँकेच्या हैद्राबादस्थित सायबर विभागाला समजताच त्यांनी नगरच्या पोलिसांना माहिती दिली.

हे पण वाचा :- ब्रेकिंग न्यूज : अहमदनगर शहरात राजकीय भूकंप !

त्यांनी शेवगाव पोलिसांना कळवले. मात्र, बँकेचा जुना पत्ता दिल्याने पोलिसांनी प्रथम तेथे धाव घेतली. कुत्रा मोठ्याने भुंकू लागल्याने बाबा सय्यद, शाहिद शेख, शाकिर शेख व इतर ग्रामस्थ बाहेर आले.

हे पण वाचा :- किरकोळ वादातून जन्मदात्या आईची हत्या, मृतदेहाचे तीन तुकडे करून साजरा केला थर्टी फस्ट !

कुत्र्यामागे त्यांनी धाव घेतली. त्यांना लांबून चोरांचा अंदाज आला. शाहिद शेख यांनी जागामालक प्रभाकर हुंडेकरी यांना फोन करून ही माहिती दिली. हुंडेकरी यांनी बंगल्याच्या छतावरून स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून हवेत गोळीबार केला.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये ट्रकने महिलेला चिरडले !

त्यामुळे चोरट्यांनी गॅसकटर, टाकी, पाइप, कटावणी आदी साहित्य तेथेच टाकून दक्षिण दिशेला पळ काढला. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेतली.

हे पण वाचा : मुंबईत सेक्स रॅकेटमध्ये अटक झाल्यानंतर अभिनेत्री म्हणाली हे तर ….

मात्र, तोपर्यंत अंधाराचा फायदा घेत चोरटे पळाले होते. त्यांनी लाडजळगाव, हातगाव रस्ता, तसेच गावात फिरून चोरट्यांचा माग काढला. मात्र, ते सापडले नाही.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment