Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

चार वर्षे झाली तो बेपत्ता आहे ! वयोवृध्द आई म्हणाली बाळा अजिंक्य! तू जिथं असशील….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अजिंक्य रमेश एळवंडे’ असं त्याचं नाव. सोनईच्या (ता. नेवासा) दरंदलेगल्लीमध्ये आई, पत्नी, मुलांसह तो राहत होता. जेमतेम पस्तीस वर्षांचा असेल तो. चार वर्षांपासून कोणाला काहीही न सांगताच केडगावमधून तो गेला.

हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले….

चार वर्षे होऊनही तो बेपत्ता आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात त्याच्या आई आणि पत्नीने मिसिंगची फिर्यादही दिली. मात्र भल्याभल्या नामचीन गुंडांना शोधणार्‍या पोलिसांना इथं मात्र सपशेल अपयश आलं.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : आमदार निलेश लंकेंच्या गावात तरुणाचा खून

कोणी म्हणतं, मला अजिंक्य शिर्डीत दिसला, माझ्याबरोबर त्याने भजे खाल्ले. पण कोणालाच त्याला घरी घेऊन येण्याची इच्छा झाली नाही. काल दि. १२ त्याच्या म्हणजे अजिंक्यच्या आईला भेटणं झालं.

हे पण वाचा :- महिलेला झाले तिच्या ड्रायव्हरवर प्रेम, मुलांसमोरच केला ड्रायव्हरसोबत सेक्स !

डोळ्यात आसवं, थकलेली ती माऊली मोठ्या काकूळतीनं म्हणाली, ‘माझ्या अजिंक्यने तो जिथं असंल तिथून सरळ घरी यावं, त्याला काहीही म्हणणार नाही.त्यानं काहीही मनात आणू नये. पत्नी आणि दोन मुलांचा विचार करुन घरी येऊन पुन्हा गुण्यागोविंदानं प्रपंच करावा’.

हे पण वाचा :- डोळ्यांना दिसतील अशीच कामे करायचीत रोहित पवारांची राम शिंदे यांच्यावर टीका !

दरम्यान, ज्या कोणाला अजिंक्य दिसेल, त्यांनी ८३६९३२८५५२ या मोबाईलवर संपर्क साधावा, अशी विनवणी अजिंक्यची वयोवृध्द आई शकुंतला रमेश एळवंडे यांनी केली आहे.

हे पण वाचा :- हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश …बॉलिवूड अभिनेत्रींना अटक !

सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती आहे, या माऊलीच्या आर्त हाकेला ‘ओ’ द्या, मुलाची, पत्नीची, आईची आणि मुलांची झालेली ताटातूट आता स्थानिक ग्रामस्थांनादेखील पाहवत नाही.

हे पण वाचा :- ब्रेकिंग न्यूज : अहमदनगर शहरात राजकीय भूकंप !

त्यामुळे आपल्या पुढाकारातून या परिवाराला एकत्र आणण्याचा प्रयत्न करा, पोलीस जे करु शकले नाहीत, ते आपण करुन दाखवा, हिच त्या माऊलीची विनंती.

हे पण वाचा :- किरकोळ वादातून जन्मदात्या आईची हत्या, मृतदेहाचे तीन तुकडे करून साजरा केला थर्टी फस्ट !

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Get real time updates directly on you device, subscribe now.