संगमनेरमधील विकासकामांची दखल देशपातळीवर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर:  तालुका विकासकामांत राज्यात अग्रेसर आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विकास व स्वच्छतेचे उपक्रम राबवले जात आहेत. या कामांची दखल देशपातळीवरही घेण्यात आली आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

हॉटेल राज पॅलेस ते १३२ केव्हीपर्यंत अकोले बायपास रस्ता व जुना जोर्वे रोड रस्त्याच्या डांबरीकरणच्या शुभारंभप्रसंगी थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते.

नगराध्यक्ष दुर्गा तांबे, कांचन थोरात, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, विश्‍वास मुर्तडक, दिलीप पुंड, गजेंद्र अभंग, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यावेळी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, संगमनेर नगरपालिकेने सातत्याने लोकाभिमुख काम करुन राज्यात ठसा उमटवला. स्वच्छ व हरित संगमनेर बनवण्यासाठी काम केले.

शहरात वैभवशाली इमारतींसह २८ नव्या गार्डनची निर्मिती, संगमनेर बाह्यवळण रस्ता, प्रवरा नदीवर चार पूल, रस्ते, भूमिगत गटारी, मोकळ्या जागांवर वृक्षारोपण अशी विविध विकासकामे शहराचे वैभव ठरली आहेत. रस्त्याच्या डांबरीकरणामुळे नागरिकांची दळणवळणाची मोठी सोय होणार आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment