Connect with us

Ahmednagar City

अहमदनगरच्या तरुणाची रणजी ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी !

Published

on

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नागोठाणे (जि. रायगड) येथे सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी क्रिक्रेट सामन्यामध्ये झारखंड विरूद्ध महाराष्ट्र संघातर्फे खेळत असलेल्या नगरच्या अझीम काझी (तांबटकर) याने चमकदार कामगिरी करत 140 धावा सातव्या विकेटसाठी विशांत मोरेबरोबर 240 धावांची विक्रमी भागीदारी केली.

यामध्ये अष्टपैलू अझीम काझी याचे 15 चौकार तर 2 उतृंग षटकाराचा समावेश होता. महाराष्ट्र संघाच्या सुरुवातीला 5 बाद 80 धावा होत्या मात्र अझीम काझी हा खेळावयास आल्यावर त्याने विशांत मोरेबरोबर भागीदारी केली धावासंख्या झपाट्याने वाढविली. अझीम काझी हा उत्कृष्ट फलदाजाबरोबरच गोलदाजही आहे. त्याने सातव्या विवेटसाठी महत्वपूर्ण अशी कामगिरी केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या आधीही हुडेकरी स्पोर्ट अ‍ॅकॅडमीचा खेळाडू अझीम काझी याने विजय हजारे ट्रॉफी व सय्यद मुस्ताक अली स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्त्व केले.आणि भरीव कामगिरीने आपली निवड सार्ध केली होती. लवकरच त्याची भारतीय संघात व आयपीएलमध्ये निवड होईल, अशी अपेक्षा क्रिकेट प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

 

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Most Popular

error: Content is protected !!