Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar SouthBreaking

अहमदनगर ब्रेकिंग : चायना मांजामुळे युवक गंभीर जखमी , घालावे लागले तब्बल ३२ टाके !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- चायना मांजामुळे युवक गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. अरबाज शेख (वय १८) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या युवकाच्या हनुवटीखालील भाग मांजामुळे कापला गेला आहे.

हे पण वाचा :- जिल्हा परिषेदतील राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन 

जखमी शेख यांना ३२ टाके घालावे लागले. डॉ. सागर बोरुडे यांनी तब्बल दीड-दोन तास अथक प्रयत्न करून मांजामुळे कापला गेलेला भाग अथक प्रयत्नाने टाके घालून शिवला.

हे पण वाचा :- वडिलांच्या श्राध्दावरून परतणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू

सध्या या युवकावर उपचार सुरू आहेत. पतंगाच्या नायलॉन मांजाला (चायना) बंदी असताना संक्रातीमुळे शहरात बुधवारी दिवसभर सर्रास नायलॉन मांजा असलेले पतंग उडविले गेले.

हे पण वाचा :- चार वर्षे झाली तो बेपत्ता आहे ! वयोवृध्द आई म्हणाली बाळा अजिंक्य! तू जिथं असशील….

संक्रांतीचा सण असल्याने शहरासह उपनगरातील अनेक भागामध्ये पतंग उडविले जात होते. नायलॉन मांजाला बंदी असताना देखील पतंग उडविताना त्याचा वापर होत होता.

हे पण वाचा :- सत्ता जाताच देवेंद्र फडणवीस यांना आली शनिची आठवण !

अरबाज शेख हा युवक बुधवारी दुपारी एकच्या सुमारास नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या बोल्हेगाव-नागापूर रस्त्याने जात असताना पतंग उडवणार्‍याचा नायलॉन मांजा तुटून त्याच्या गळ्याला अडकला,

हे पण वाचा :- सुजित झावरेंचा हल्लाबोल : वसंतरावांचा विसर पडल्याने राहुल झावरे बेदखल झाले !

त्याने तो काढण्याचा प्रयत्न केला. पण हनुवटीखालील भागाला तो अडकून ओढला गेल्याने हा भाग कापला गेला. जखमेतून रक्त वाहू लागल्याने आजूबाजूच्या लोकांनी त्याला तेथे जवळच असलेल्या डॉ. बोरुडे यांच्या रुग्णालयात नेले.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

त्यांनीही तातडीने जखम साफ करून त्यावर टाके टाकले. पण हनुवटीला अडकल्यावर मांजा ओढला गेल्याने हनुवटीच्या वरच्या भागही कापला गेला आहे. हा सर्व भाग टाके घालून शिवण्यात डॉ. बोरुडे यांचे कौशल्य पणास लागले.

हे पण वाचा :- तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेतून बाहेर पडतील !

या युवकावर उपचार सुरू असल्याचे डॉ. बोरुडेंनी सांगितले. ही घटना घडण्यापूर्वी पाच वर्षाच्या लहान मुलाच्या कपाळावर मांजाने कापले गेले असल्याने त्याच्यावरही तीन टाके घालून उपचार केल्याचेही त्यांनी सांगितले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close