भाजपकडून माजी खासदार दिलीप गांधी यांना मोठा धक्का

amc adv

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भारतीय जनता पार्टीच्या नगर जिल्ह्यातील तीनही जिल्हाध्यक्षांच्या निवडी सोमवारी भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी जाहीर केल्या.नगर शहर जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक महेंद्र उर्फ भैय्या गंधे यांची निवड करण्यात आली.भाजपच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी अरुण मुंडे तर उत्तर जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र गोंदकर यांची नियुक्ती जाहिर करण्यात आली आहे.

हे पण वाचा :- सुजित झावरेंचा हल्लाबोल : वसंतरावांचा विसर पडल्याने राहुल झावरे बेदखल झाले !

अहमदनगर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या पक्षांतर्गत निवडीचा घोळ गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता.मागील आठवड्यात प्रदेश भाजपाने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खा.गिरीश बापट यांची नियुक्ती केली होती.खा. बापट यांनी नगरमध्ये येऊन भाजप पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली होती.

हे पण वाचा :- चार वर्षे झाली तो बेपत्ता आहे ! वयोवृध्द आई म्हणाली बाळा अजिंक्य! तू जिथं असशील….

मात्र तब्येतीच्या कारणामुळे खा.बापट यांच्याऐवजी माजी विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांची नियुक्ती केली.मागील आठवड्यात नगरमधील सावेडी उपनगरात कोहिनूर मंगल कार्यालयात हरिभाऊ बागडे यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या

हे पण वाचा :- तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेतून बाहेर पडतील !

यावेळी तीनही जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने त्यांनी या निवडीचा पेच प्रदेश भाजपकडे सोपवला.दरम्यान बागडे यांनी सोमवारी नगर जिल्ह्यातील तिनही जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली.

Loading...

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

नगरमध्ये मुलाखतीचेवेळी नगर शहरात जिल्हाध्यक्षपदासाठी ८,दक्षिणेतून १४ तर उत्तरेतून १७ जणांनी मुलाखती दिल्या होत्या.त्यात नगर शहर जिल्हाध्यक्षपदासाठी माजी नगरसेवक सचिन पारखी,नगरसेवक महेंद्र गंधे,सुवेंद्र गांधी,जगन्नाथ निंबाळकर,दामोदर बठेजा, मनेष साठे,विनोद भिंगारे,बंटी डापसे यांनी मुलाखत दिली होती.

हे पण वाचा :- वेबसाईटद्वारे चालविण्यात येणारे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त !

इच्छूकांमध्ये एकमत न झाल्याने हरिभाऊ बागडे यांनी कोर कमिटीची बैठक घेऊन इच्छुकांची नावे प्रदेश भाजपाकडे पाठवली होती.दरम्यान सोमवारी या निवडी जाहीर करण्यात आल्या.शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी हे इच्छुक होते.पक्षाने शहर जिल्हाध्यक्ष पदावर नगरसेवक महेंद्र उर्फ भैय्या गंधे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने माजी खासदार गांधी गटाला मोठा धक्का मानला जातो.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com