ऐश्वर्या वाघ हिचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरव

amc adv

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर येथे 14 जानेवारी 2020 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा साजरा करण्यात आला.

महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य शाखेत शिकत असलेली कु. ऐश्वर्या रवींद्र वाघ हिने शैक्षणिक गुणवत्तेवर बरोबरच क्रीडा क्षेत्रात नैपुण्य सिद्ध करून तायकांदो व बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांमध्ये आपले कौशल्य दाखवत शालेय व जिल्हास्तरीय तसेच पंजाब ,राजस्थान ,मेरट येथे संपन्न झालेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धे बरोबरच पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला .

एक रौप्य व 12 सुवर्णपदकाची मानकरी ठरवत पुरस्कारास सार्थ ठरवत तिचा गौरव करण्यात आला.

Loading...

या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून श्री अभ्यासक रजिया पटेल तर अध्यक्षस्थानी ऍड. दीपलक्ष्मी म्हसे तसेच संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील उपाध्यक्ष रामचंद्र सचिव जीडी खानदेशी सहसचिव विश्वासराव आठरे पाटील खजिनदार डॉक्टर विवेक भापकर, प्राचार्य डॉक्टर झावरे, एल आर हराळ, ए.के. पंदरकर, आर.जी.कोल्हे, समन्वयक डॉक्टर वैशाली भालसिंग, सह प्राध्यापक व शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष मार्गदर्शन क्रीडा प्रमुख शरद मगर सर हराळ सर लाटे सर यांचे लाभले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com