Ahmednagar North

शिवसेनेला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी : श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशच असल्याचा पुरावा मागणाऱ्या शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केला आहे.

खा. राऊत यांच्या वक्तव्याचा शिर्डी शहर भाजपच्या वतीने जाहीर निषेध करीत असून, शिवसेनेने माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.भाजप शिर्डी शहरच्या वतीने शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, तालुका सरचिटणीस रवींद्र पांडुरंग गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना याबाबत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचा पुरावा उदयनराजे यांच्याकडे मागितला. छत्रपतीच्या घराण्याचा हा अपमान भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता सहन करणार नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

शिवसेनेला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरला नसून या अपमानास्पद वक्तव्याबद्दल शिवसेनेने माफी मागावी, अशी मागणी केली.

श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी शिवसेनेवर आणि विशेषत: संजय राऊत यांच्यावर केलेली टीका त्यांना झोंबली असेल तर ते समजू शकतो. त्यांना शक्य असेल तर छत्रपतीच्या सवालांना उत्तरे द्यायला हवी होती, पण उत्तर देता येत नाही तर थेट त्यांच्या वंशाचा पुरावा मागणे हे उद्दामपणाचे लक्षण आहे.

एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी सांगायची आणि दुसरीकडे त्यांच्या वंशजाबद्दल अशी खालच्या दर्जाची टिप्पणी करायची हे शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी दाखविणारे आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खा. राऊत यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

 

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close