लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  शेतमजुरीचे काम करणाऱ्या श्रीरामपूर तालुक्यातील रामगड येथील ३६ वर्षांच्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले.

याप्रकरणी बेलापूर (कुऱ्हे वस्ती) येथील शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रामगड येथील पीडित महिलेस आरोपी राजेंद्र रघुनाथ भांड (रा. कुऱ्हे वस्ती) याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले.

संबंधित महिलेने याबाबत पोलिसात फिर्याद दाखल केली. अत्याचारित महिलेने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र रघुनाथ भांड (रा. कुऱ्हे वस्ती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 

Leave a Comment