Ahmednagar NewsBreaking

राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत भानुदास मुरकुटे म्हणतात …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : राज्यात तीन पक्षांचे सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरली. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात असल्याने काँग्रेस शिवसेनेशी युती करू शकली.

पृथ्वीराज चव्हाण असते, तर हे सरकार स्थापण्यात अडचणी आल्या असत्या. पवार केंद्रस्थानी असल्याने सरकार चांगले चालेल, असा विश्वास माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी शनिवारी व्यक्त केला. अशोक बँकेत पत्रकारांशी वार्तालाप करताना मुरकुटे बोलत होते.

ते म्हणाले, जरी तीन पक्षांचे सरकार असले, तरी विचारधारा एक आहे. देश आणि राज्याच्या हितासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. इंदिरा गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांनी देशहितासाठी काही निर्णय घेतले. त्यामुळे सर्वच घटक खूश होऊ नाहीत. मात्र, देशहित सर्वोच्च असते.

सरकारमध्ये निर्णयक्षमता असायलाच हवी, तरच सामाजिक हिताचे निर्णय होऊ शकतात. घुळघुळं नेतृत्व असेल, तर निर्णय होत नाहीत. काय व्हायचे ते होईल, पण उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घ्यायचे.मध्यंतरी मुरकुटे यांनी बारामतीत शरद पवार यांची भेट घेतली होती.

त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची चर्चा झाली होती. मात्र, त्यांनी प्रवेशाचा इन्कार केला. याबाबत ते म्हणाले, यापूर्वी अशा दोन-तीन भेटी झाल्या असून यानंतर आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार अशी संयुक्तपणे बैठक होणार आहे. मात्र, भेट कशाबाबत हे सांगण्यास त्यांनी टाळाटाळ केली.

Web Title –  Bhanudas Murkute is said to have entered the-ncp

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button