BreakingMaharashtra

गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा ; शिक्षकांकडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नांदेड :- येथील एका विद्यार्थीनीवर शाळेतील 2 शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आले. शंकरनगरमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे.

पीडित मुलगी सहावीत शिकत असून सध्या तिची प्रकृती गंभीर आहे. उपचारासाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकरनगर येथील एका नामांकित शाळेत पिडीत मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकते. 2 महिन्यांपूर्वी आरोपी शिक्षक रसूल सय्यद आणि दयानंद राजुळे यांनी मुलीला सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्हिडिओ दाखवतो म्हणून शाळेतील एका खोलीत नेले.

मोबाईलमध्ये अश्‍लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर दोघांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले. घटनेला २ महिने उलटले असून पीडित मुलीची प्रकृती बिघडल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची तक्रार पीडितेच्या आईने शाळा प्रशासनाकडे केली होती. पण विधवा असलेल्या मातेला दबाव टाकून परत पाठवण्यात आले. घडलेला प्रकार कळताच विद्यालय परिसरात खळबळ उडाली.

धक्कादायक म्हणजे, मुलीच्या आईने मुख्याध्यापकांकडे तक्रार करुनदेखील कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. बदनामीच्या भीतीने आई गप्प बसली. परंतु काही दिवसांपासून मुलीची प्रकृती बिघडली.

तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत माहिती मिळाल्यावर ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांनी आवाज उठवला आणि त्यानंतर रामतीर्थ पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title – Teacher rapes student who is studying in class six

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close