आमदाराच्या प्रभागातच स्वच्छता मोहिमेचे वाजले बारा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी व ओडीएफ प्लस चे सर्वेक्षण यशस्वी करण्यासाठी अनेक समाजिक संस्था, महापालिका प्रशासनास नगरकर सरर्सावले आहेत. त्यासाठी शहरात रात्रंदिवस घंटागाड्या फिरत असून ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे.

व कचरा पेटविण्यासही जिल्हाधिकारी यांनी बंदी घातली आहे. मात्र, लोकप्रतिनिधी यांच्या प्रभागातच कचरा धगधगत असून एक प्रकारे स्वच्छता मोहिमेलाच खो घातला असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये भाग घेतलेला आहे.

महापालिकेला ओडीएफ प्लस चा दर्जा यापूर्वीच मिळालेला आहे. तसेच स्वच्छतेत वन स्टार मानांकन यापूर्वीच मिळालेले आहे. आता थ्री स्टार रॅंकींगसाठी मनपा सर्वेक्षणात सहभागी झाली आहे. या अंतर्गत नागरिकांचा सहभाग या घटकातील तपासणीसाठी केंद्र शासनाचे पथक शहरात आले आहे.

नागरिकांना फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून स्वच्छ सर्वेक्षण 2020 संदर्भात प्रश्न विचारणार आहे. या प्रश्नांची नागरिकांनी सकारात्मक उत्तरे देवून आपल्या शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये जास्तीत जास्त गुणांकन मिळवून देण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे तसेच महापालिका प्रशासन करत आहे.मात्र याकडे नागरिक दुर्लक्ष करत असून कचरा पेटविला जात असल्याचे दिसत आहे.

शहरात स्वच्छता अभियान जोरदार सुरु असून, घरघुती स्वरुपाच्या कचऱ्याचे घरातच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करुन तो वेगवेगळ्या कचरा पेटीत टाकून संकलनासाठी आलेल्या घंटागाडीत कचरा स्वतंत्रपणे टाकावा. तसेच ओला कचऱ्याचे घरीच कंपोस्टींग करुन खत तयार करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सहकार्य करावे.

ओडीएफ प्लस चे सर्वेक्षण पूर्ण झाले असून केंद्राचे पथक नगर शहरात दाखल झाले असतांना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. कचरा संकलनासाठी स्वयंभू ट्रान्सपोर्टकडून रात्रदिवस कचरा संकलन करण्यात येत आहे. मात्र, सारसनगर भागात नाल्याच्या कडेलाच कचरा पेटवून देण्याचा प्रकार घडत आहे.

Web Title – Cleanliness campaign in the MLA’s ward is verry-bad!

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment