थोडं जरी काम केलं की, लगेच थकवा जाणवतो ? हे नक्की वाचा 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तुम्हाला थोडं जरी काम केलं की, लगेच थकवा जाणवतो ? यामागे अनेक कारणं असू शकतात; पण असं रोज होत असल्यास तुमचा स्टॅमिना कमी असल्याची शक्यता आहे. स्टॅमिना कमी असण्याचा परिणाम आपल्या शरीरासह आपल्या मेंदूवरही होत असतो. स्टॅमिना एक अशी ताकद आहे, ज्यामुळे आपण दिवसभर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक काळ काम करू शकतो. काही घरगुती उपायांनाही स्टॅमिना वाढविण्यास मदत होऊ शकते.

1) नाश्ता 
दिवसाची सुरुवात स्वस्थरीत्या करा. नाश्ता दिवसातील सर्वांत प्रमुख जेवण आहे. यामुळे शरीरातील मेटाबोलिज्म वाढतं. यामुळे शरीरातील कॅलरी वाढेल आणि एनर्जी आणि स्टॅमिनाही वाढण्यास मदत होईल.

2) संगीत
संगीत व्यक्तीचा मूड सुधारण्यासाठी फायदेशीर असल्याचं संशोधनातून सांगण्यात आलं आहे. जे लोक व्यायामादरम्यान संगीत ऐकतात त्यांचा हार्टरेट, त्या लोकांपेक्षा कमी असतो जे असं करीत नाहीत. यामुळे स्टॅमिना वाढविण्यास मदत होऊ शकते.

3) व्यायाम
व्यायाम व्यक्तीचा शारीरिक आणि मानसिक स्टॅमिना वाढविण्यासाठी फायदेशीर आहे. व्यायामानं दिवसभर ऊर्जा राहण्यास, स्टॅमिना वाढविण्यास मदत होते. चालणं, स्विमिंग, एरोबिक्सनं फायदा होऊ शकतो. योगा, ध्यान-धारणेनं ताणतणाव दूर राहण्यास मदत होते.

4) धूम्रपान 
धूम्रपानामुळे शरीराच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेवर परिणाम होत असतो. स्टॅमिना वाढविण्यासाठी धूम्रपान सोडणं आवश्यक आहे.

5) झोप
प्रत्येक व्यक्तीला सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. त्यामुळे मेंदूचा आणि शरीराचा परफॉर्मन्स चांगला राहतो. चांगली झोप येत नसेल, तर योगा करू शकता. यामुळे चिंता, मानसिक थकवा कमी होण्यास मदत होते. रात्री लवकर जेवा, यामुळे जेवण पचून झोप चांगली येण्यास फायदा होऊ शकतो.

6) आहार
स्टॅमिना आपल्या आहारावरही अवलंबून असतो. आहारावर अधिक लक्ष द्या. जेवणामुळे शरीराला चांगली ऊर्जा मिळते. दिवसांतून चार ते पाच वेळा थोड्या वेळानं खाणं फायद्याचं ठरतं. आहारात कार्बोहायड्रेट्सचा समावेश करा. आहारात नारळाच्या तेलाचा उपयोग गुणकारी ठरतो. हे तेल पचायला हलकं असून स्टॅमिना वाढविण्यासही मदत होते.

Even if a little work done, do you immediately feel tired? Read this

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment