शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला आहे !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  शिवसेनेचा २०१४ मध्ये काँग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव होता’ हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान गांभीर्याने घ्यावे लागणार असून यानिमित्ताने शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला आहे, अशी तोफ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डागली.

पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे एक वरिष्ठ व जबाबदार नेते आहेत. त्यांनी शिवसेनेबाबत केलेले विधान आमच्यासाठी आश्‍चर्यकारक आहेच, शिवाय शिवसेनेचा खरा चेहरा समोर आणणारेही आहे. हे विधान गांभीर्याने घ्यावे लागेल. यातून शिवसेनेसाठी विचारधारा नव्हे तर केवळ सत्ताच सर्वतोपरी असल्याचे स्पष्ट होते.

यावर शिवसेनेला स्पष्टीकरण द्यावे लागेल, असे आव्हानच फडणवीस यांनी दिले. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. २०१४ पासून काँग्रेस-शिवसेना आघाडीचे प्रयत्न सुरू होते हा खुलासा धक्कादायक आहे. शिवसेनेचा सत्तामोही चेहरा यामुळे समोर आला आहे.

दिवसा आमची सोबत आणि रात्री काँग्रेसशी चर्चा हे शिवसेनेचे वागणे क्लेशदायक आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. दुसरीकडे काँग्रेस नेते व मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला दावा खरा आहे, असे म्हणत त्यास दुजोरा दिला आहे.

०१४ मध्ये तसा काही प्रस्ताव दिल्याचे आपल्याला माहिती नसल्याचे शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी म्हटले आहे. पृथ्वीराज चव्हाण तशा प्रस्तावाबाबत बोलत असतील, तर त्यांनी हा प्रस्ताव देताना उपस्थित असणार्‍यांची नावे उघड करावीत, असे आवाहन केले. पृथ्वीराज यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसनेही इन्कार केला. शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असा कोणताही प्रस्ताव आलेला नव्हता, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.

Web Title – Shiv Sena’s true face has been revealed!

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment