मंत्रिपदाचा वापर शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ राहुरी : गेल्या तीन वर्षांच्या विकास कामाचा अनुशेष भरून काढून मिळालेल्या मंत्रिपदाचा वापर शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी करू. त्यासाठी भावी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन नगरविकास ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

राहुरी नगरपालिकेच्या सभागृहात काल ना. तनपुरे यांचा पालिकेचे कर्मचारी, अधिकारी तसेच प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी ना. तनपुरे बोलत होते. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष राधा संजय साळवे, माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे, मुख्याधिकारी डॉ. श्रीनिवास कुऱ्हे उपस्थित होते.

ना. तनपुरे म्हणाले, राहुरी नगरपालिका हद्दीतील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याची भूमिका राहील. मागील भाजपच्या काळात विरोधी असणाऱ्या पालिकांचा निधी हेतुपूर्वक अडविण्याचे काम झाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी उपलब्ध करून विकासाचा अनुशेष भरून काढला जाईल.

नगराध्यक्षपदाच्या काळात सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. शहराच्या विकासासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले होते. ते नगरविकास राज्यमंत्री या नात्याने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. रमाई आवास योजना, वाढीव सुधारित पाणीपुरवठा योजना, भूमिगत सांडपाणी योजना, रस्ते, वीज, आदिवासी विकास यासह विविध कामे मार्गी लावायची आहेत.

आधुनिकतेच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नवीन अध्यक्षांनी अधिक लक्ष घालणे गरजेचे आहे. शहराला लागू असलेल्या ग्रीन झोनबाबत मंत्रालयात बैठक घेऊन प्रश्न सोडविणार आहे. यावेळी नगरसेवक प्रकाश भुजाडी, सूर्यकांत भुजाडी, विरोधी पक्षनेते शिवाजी सोनवणे, बाळासाहेब उंडे, मुख्याधिकारी श्रीनिवास कुऱ्हे, बचत गटाच्या सुनंदा दहातोंडे, शीला राहिंज यांची भाषणे झाली.

यावेळी नगरसेवक अनिल कासार, दिलीप चौधरी, राहुरी सेवा संस्थेचे उपाध्यक्ष विलास तनपुरे, सोन्याबापू जगधने, अण्णासाहेब शेटे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती संगीता आहेर, ज्योती तनपुरे, अनिता पोपळघट, सुमती सातभाई, मुक्ता करपे, नंदा उंडे, संजय साळवे, अशोक आहेर, गजानन सातभाई, जि. प. सदस्य धनराज गाडे, माजी सरपंच प्रभाकर गाडे, नवाज देशमुख, पालिकेचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पालिकेचे अधीक्षक सुनील फडके यांनी आभार मानले.

Web Title – The use of the ministry to change the face of the city – Minister Prajakat Tanpure

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment