World

हा आहे जगातील सर्वात घाणेरडा माणूस, ज्याने गेल्या ६० वर्षात अंघोळच नाही केली !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  एखाद्या व्यक्तीने ६० वर्षे अंघोळच केली नसेल तर? बापरे!!! तर अशी एक व्यक्ती आहे. अमू हाजी हे सदर व्यक्तीचे नाव आहे. तिला सर्व जग ‘जगातील सर्वात घाणेरडा माणूस’ म्हणून ओळखते.

८४ वर्षे वय असणाऱ्या अमूच्या म्हणण्यानुसार, त्याने अंघोळ केली तर तो आजारी पडेल. त्याला त्वचारोग होणार. म्हणून त्याने ६० वर्षांपासून अंघोळच केली नाही. त्याची संपूर्ण त्वचा हत्तीच्या चामडीप्रमाणे झाली आहे.

इराणमधील देझघा नावाच्या गावात गावाबाहेर अमू राहतो. या भागात पाऊस नसल्याने त्याची आपोआप अंघोळ होणे अशक्यच आहे. गावतील लोक सांगतात की, त्याला अंघोळ करताना आजपर्यंत कुणीच बघितले नाही.

तो सिगारेटपेक्षा पाइप ओढणे जास्त पसंत करतो. गावातील बाहेरील भागात त्याचे एक विटाचे घर आहे, जेथे अमू कित्येक वर्षांपासून राहतो.

तो कोणासोबत संबंध ठेवतसुद्धा नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे भूतकाळात त्याच्यासोबत काही अशा घटना घडलेल्या आहेत, ज्यामुळे तो मानवी वस्तीपासून लांब राहतो.

Web Title – This is the dirtiest man in the world who has not bathed in the last 6 years!

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button