IndiaLifestyleWorld

अशी करावी ‘रात्रीची’ सुरक्षित चॅटिंग Tips for safe night chatting

स्मार्टफोनच्या जगात वावरताना अनेक जण आप-आपल्या प्रेयसी अथवा प्रियकरासोबत अश्लील चॅटिंग करत असतात. सोबतच मित्र आणि मैत्रिणी एकमेकांना अश्लील मेसेज पाठवत असतात. आपला मुलगा किंवा मुलगी असे काही करत नाही ना अशी चिंता नेहमीच पालकांना असते.

त्यातही अश्लील चॅटिंग करताना संभाषण लीक होण्याचा सुद्धा मोठा धोका असतो. परंतु, अमेरिकेतील भारतीय संशोधक आणि त्याच्या टीमने ‘सेफ सेक्सटिंग’ वर अर्थात सुरक्षित अश्लील चॅटिंगवर अजब संशोधन मांडले आहे. त्याच्या मते, पालकांनी आपल्या मुला-मुलींना सेक्सटिंग करण्यापासून रोखणे सोडून सुरक्षित सेक्सटिंग कशी करावी हे शिकवावे. या संशोधनात सेक्सटिंगच्या काही टिप्स देखील देण्यात आल्या आहेत.

 • एखाद्या व्यक्तीने तुम्हाला अश्लील मेसेज पाठवल्यास ते कुणालाही पाठवू नका आणि कुणालाही दाखवू नका. हा मेसेज एखाद्या व्यक्तीला न सांगता केलेली पोर्नोग्राफी सुद्धा असू शकते.
 • कुणालाही सेक्स्ट अर्थात अश्लील मेसेज पाठवण्यापूर्वी तुम्ही त्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखता आणि त्याच्यावर विश्वास ठेवता याची खात्री करा. आणि एखाद्या व्यक्तीला ते पाहावेसे वाटणार नाहीत असे काहीही पाठवू नका.
 • फोटो पाठवताना पूर्णपणे नग्न फोटो पाठवणे सोडून बूडॉइर अर्थात थोडेफार कपडे घातलेले फोटोच पाठवण्यास प्राधान्य द्या.
 • सर्वात महत्वाच्या सल्ल्यांपैकी एक म्हणजे, कुठल्याही न्यूड फोटो किंवा व्हिडिओमध्ये तुमचा चेहरा किंवा अशी कोणतीही गोष्ट दाखवू नका ज्यावरून तुमची ओळख पटेल.
 • आजकाल अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चेहरा ओळखून सोशल मीडिया प्रोफाइल दाखवण्याची सुविधा आहे. त्यामुळे, अश्लील व्हिडिओ, फोटोमध्ये चेहरा दिसल्यास अनोळखी व्यक्ती सुद्धा तुमची संपूर्ण माहिती सहज मिळवू शकते.
 • “तुम्ही पाठवत असलेल्या तुमच्या फोटो किंवा व्हिडिओमध्ये तुमच्या शरीरावर असलेला कुठलाही टॅटू, मार्क किंवा ओळख पटेल असे काहीच दिसणार नाही याची काळजी घ्या. 
 • “सेक्सटिंग करताना आपल्या मोबाइलचे लोकेशन आणि सोशल मीडिया अॅप्सचे लोकेशन अॅक्सेस बंद ठेवा. तुमचे फोटो आपो-आप जिओ टॅग किंवा यूझरनेमने निर्देशित होत नाहीत ना याची देखील काळजी घ्या.
 • फोटोशी संबंधित कुठलाही मेटा-डेटा (अतिरिक्त डिजिटल माहिती) डिलीट करा.”
 • “कुणीही न्यूड फोटो किंवा व्हिडिओ पाठवण्यासाठी तुमच्यावर दबाव टाकत असेल किंवा ब्लॅकमेल करत असेल तर शक्यतो त्याचा पुरावा तुमच्याकडे ठेवा.
 • तुम्ही समोरच्या व्यक्तीचे कॉल रेकॉर्ड, मेसेजचे स्क्रीनशॉट इत्यादी जपून ठेवू शकता. कायदेशीर कारवाई करण्यासाठी तेच आधार ठरतील.”
 • “काही मेसेजिंग अॅप्समध्ये फोटो पाठवल्यानंतर ठराविक काळानंतर आपो-आप सुरक्षितरित्या डिलीट होण्याची सुविधा असते. असे अॅप्स वापरता येतील.”
 • “चॅटिंग केल्यानंतर तुमच्या डिव्हाइसमधील सर्वच अश्लील मेसेजेस, फोटो आणि व्हिडिओ डिलीट झाले की नाही याची आवश्य खात्री करून घ्या. तुम्ही स्वतःचे फोटो, सेल्फी घेतले असतील ते सुद्धा डिलीट करा.”

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button