केके रेंजमुळे मुळा धरणाला धोका निर्माण होऊ शकतो – शरद पवार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- केके रेंजमुळे मुळा धरणाला धोका निर्माण होऊ शकतो. याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी वेळप्रसंगी संघर्ष करण्याची तयारी या भागातील लोकांना ठेवावी लागेल, हे स्पष्ट करत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला सांगितले.

हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल 332 अल्पवयीन मुलींचे अपहरण !

राहुरी, नगर व पारनेर या तीन तालुक्यांतील २३ गावांवर केके रेंजच्या विस्तारीकरणामुळे संकट उभे राहिल्याने पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मुंबईत पवार यांची भेट घेऊन विस्थापित होण्याची वेळ आलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली.

हे पण वाचा :- ‘लोकनेते’ हे पद विखे पाटील परिवारासाठी इतर पदापेक्षा सर्वात मोठे – खा. सुजय विखे पाटील

आठवडाभरापूर्वी राहुरी तालुक्यातील वावरथ, जांभळी, वनकुटे, जांभुळबन, तसेच पारनेर भागातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केके रेंज विस्तारीकरणासंदर्भात सुरू असलेल्या हालचालींना विरोध केला होता. मंगळवारी आमदार लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती.

हे पण वाचा :- बायकोने दरवाजा उघडायला केला उशीर, DSP ला आला राग केला पत्नीवर गोळीबार …

बुधवारी आमदार लंके यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही तालुक्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या वेळी पवार म्हणाले, केके रेंज विस्तारीकरणाची मला पूर्ण माहिती आहे. लष्कराने नोटिफिकेशन काढले त्यावेळची या भागातील परिस्थिती वेगळी होती.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : नालायक शिक्षकाने १२ वी सायन्सच्या विद्यार्थिनीकडे केली सेक्सची मागणी !

आज शेतकऱ्यांनी जमिनी बागायती केल्या आहेत. मुळा धरणाच्या पाण्यावर नगर जिल्ह्यातील बहुतांशी भाग अवलंबून आहे. केके रेंजमुळे मुळा धरणाला धोका निर्माण होऊ शकतो. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी वेळप्रसंगी संघर्ष करण्याची तयारी या भागातील शेतकऱ्यांना ठेवावी लागेल.

हे पण वाचा :- जत्रा पाहायला गेलेल्या चार अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्कार

जिल्ह्यातील २३ गावांवर केके रेंजच्या विस्तारीकरणाने संकट केके रेेंजच्या विस्ताराविरोधात पारनेर, नगर व राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मुंंबईत शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.

हे पण वाचा :- 5 वर्षे मंत्री राहूनही जे राम शिंदेना करता आले नाही ते रोहित पवारांनी महिन्यात करून दाखवले !

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment