उत्तरपत्रिका दाखवली नाही म्हणून बेदम मारहाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- हिंदीच्या परीक्षेत उत्तरपत्रिका दाखवली नाही, या कारणावरून कोपरगाव तालुक्यातील  एस. जी. विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्याला अन्य आठ विद्यार्थ्यांनी चॉपर व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. सकाळी ८ वाजता हिंदीचा पेपर होता.

उत्तरपत्रिका दाखवली नाही, म्हणून संबंधित विद्यार्थ्याला पेपर सुटल्यानंतर शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

तो गंभीर जखमी झाला असून त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून ते फरार आहेत.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment