पद्मश्री झहीर खान : श्रीरामपूरचा मराठी मुलगा ते भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यातील मूळचा श्रीरामपूरचा असलेला आणि भारतीय क्रिकेट संघात प्रतिनिधीत्त्व करीत जगात आपल्या गोलंदाजीचा दबदबा निर्माण करणाऱ्या झहीर खानला पद्मश्री जाहीर झाला आहे. जहीरचा सन्मान झाल्याची माहिती मिळताच नगरच्या क्रीडा वर्तुळात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

झहीरने श्रीरामपूर शहरातून क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती. नगरच्या क्रॉम्प्टन क्रिकेट करंडकातही त्याने अनेकदा सहभाग घेतला होता. प्रारंभी तो बडोद्याकडून खेळला. रणजी क्रिकेट करंडकात त्याने छाप पाडल्यानंतर त्याची भारतीय संघात निवड झाली.
झहीर खान याचे नाव पाकिस्तानचा क्रिकेटपटू झहीर अब्बास यांच्या नावावरून ठेवण्यात आले. त्याचे टोपण नाव जॅक असे आहे. तो कपिलदेव नंतरचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. झहीर खान हा मध्यम वर्गीय कुटुंबातील आहे. त्याच्या वडिलांचे नाव बख्ख्तीयार खान असे असून ते फोटो ग्राफर आहेत. 

त्याच्या आईचे नाव झकिया खान असून त्या शिक्षिका आहेत. झहीर खानला दोन भावंड आहेत. झहीरच्या क्रिकेट श्रेत्रातील कारकिर्दीस २००० साली सुरुवात झाली. जेव्हा तो पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेला तेव्हा तेथे क्रिकेट क्लब मध्ये जाणे सुरु केले. झहीर खान हा डावखुरा गोलंदाज असून तो कसोटी क्रिकेट मधील ११ व्या क्रमांकावर फलंदाजीस येवून सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज हा विक्रम ही त्याने केला आहे.

रणजी क्रिकेट करंडकात त्याने छाप पाडल्यानंतर त्याची भारतीय संघात निवड झाली. या डावखुऱ्या गोलंदाजाने अल्पावधीतच छाप पाडली. ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना त्याने अप्रतिम यॉर्करवर महान फलंदाज स्टीव्ह वॉ याचा त्रिफळा उडवला, तेव्हापासून तो प्रकाश झोतात आला. भारतीय क्रिकेट संघाचा तो मुख्य गोलंदाज झाला. त्याने अनेक सामने एकहाती जिंकून दिले. यॉर्कर हे त्याच्या गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र होते.

झहीर याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर झेडकेज नावाने हॉटेल सुरू केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. झहीरच्या श्रीरामपुरातील आठवणी या पद्मश्रीमुळे जाग्या झाल्या. भारतीय संघात त्याची निवड झाल्यानंतर जिल्हा क्रिकेट संघटनेने त्याचा मोठा सन्मान सोहळा केला होता.

 

श्रीरामपूरचा हा मराठी मुलगा विशेष कशाचा पाठींबा नसताना क्रिकेटमध्ये आला. भारतातल्या खेळपट्ट्या, उष्मा, मैदाने आणि क्षेत्ररक्षण यांच्या उदासीनतेसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशेहून अधिक बळी मिळवून गेला श्रीरामपूर सारख्या छोट्या शहरातून पुढे आलेल्या झहीर खानने आपल्यातील क्रीडा कौशल्याची चमक दाखवत थेट भारतीय क्रिकेट संघात प्रवेश मिळविला व आज आपल्या देशाचा जलदगती गोलंदाज म्हणून नाव कमाविले.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment