व्होडाफोनच्या ग्राहकांना धक्का

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : आरबीआयने व्होडाफोनच्या पेमेंट ऍपची मानत्या रद्द केली आहे. आरबीआयने २०१५ साली मोबाईल पेमेंटसाठी ११ कंपन्यांना सर्टिफिकेट ऑफ ऑथोरायजेशन लायसन्स दिलं होतं.

या मुळे व्होडाफोनचं पेमेटं ऍप व्होडाफोन एम-पिसा वरुन तुम्हाला आता व्यवहार करता येणार नाहीत. एम-पिसा ऍप आता व्यवहार करण्यासाठी अवैध झालं आहे. 

व्होडाफोनने एम-पिसामधून मागच्या एका वर्षात पेमेंटचं काम जवळपास थांबवलं आहे. या ऍपला एखादी बँक विकत घेईल, अशी कंपनीला अपेक्षा होती, पण असं झालं नाही.

व्होडाफोनकडून हे लायसन्स परत दिल्यानंतर आरबीआय याच्या संचलनावर बंदी घालणार आहे. त्यामुळे व्होडाफोन ऍपमध्ये तुम्ही पैसे ठेवले असतील किंवा तुम्ही या ऍपच्या माध्यमातून पेमेंट करत असाल तर तत्काळ थांबवा. एम-पिसा अकाऊंटमध्ये पैसे असतील तर है पैसे काढून घेण्याच्या सूचना आरबीआयने केल्या आहेत.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment