Ahmednagar NewsPolitics

संघटनेने विद्यार्थ्यांबरोबरच समाजातील प्रश्‍न सोडवावे – सत्यजित तांबे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर – राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेत अनेक आमदार निवडून आणण्यात मोलाचे काम केले आहे. त्यामुळेच आज अनेक युवक आमदार हे विधानसभेत दाखल झाले आहेत. युवकांची शक्ती काय असते हे एनएसयूआयने दाखवून दिले आहे.

युवक काँग्रेसचे जिल्ह्यातील कार्यही मोठ्या जोमाने सुरु असून, अनेक युवक यामध्ये दाखल होत आहेत. युवा नेते राहुल गांधी यांच्या विचार व देशाप्रती असलेल्या निष्ठा सर्वसामान्यांची प्रश्‍न सोडविण्यासाठीच तळमळ युवकांना भावत आहे. त्यामुळे युवक काँग्रेसमध्ये सध्या चैतन्य संचारले आहे.

युवकांनी आपआपल्या भागात चांगले काम करुन नागरिकांचे, शेतकर्‍यांचे, युवकांचे, विद्यार्थी आदि प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे. जिल्हा शाखेच्यावतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेमुळे माहिती उपलब्ध होणार आहे, अशा उपक्रमात नागरिकांशी कायम संपर्कात राहवे, असे आवाहन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले.

एनएसयुआय विद्यार्थी संघटन व हेल्पिंग हॅण्डस् फौंडेशनच्या कॅलेंडरचे प्रकाशन प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा, हेल्पिंग हॅण्डस् युथ फौंडेशनचे अध्यक्ष भैय्या बॉक्सर, मालपाणी उद्योग समुहाचे गिरिष मालपाणी, अल्ताफ बागवान, युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्‍वर दिवटे, दानिश शेख, मयुर पाटोळे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा म्हणाले, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांसाठी संघटनेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. फि वाढ, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची फि माफी, परिक्षांमधील घोळ, शिष्यवृत्ती आदिंसाठी संघटनेच्यावतीने वेळप्रसंगी आंदोलने केली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्‍न मार्गी लागले आहेत.

याप्रसंगी भैय्या बॉक्सर म्हणाले, दिनदर्शिकेच्या उपक्रमांमुळे विद्यार्थी व युवकांना एकत्र करुन त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनीही आपल्या अडचणी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना सांगितल्यास त्या नक्कीच सोडविण्यात येतील, असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमेश्‍वर दिवटे आभार अल्ताफ बागवान मानले. यावेळी एनएसयुआयचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com 

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close