अहमदनगर ब्रेकिंग : मतिमंद महिलेवर अत्याचार करणाऱ्या तळीरामांना अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव शहरातील मतिमंद महिलेवर दोन तळीरामांनी अत्याचार केले. अत्याचार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

गुरुवारी सायंकाळी जालिंदर कचरू त्रिभुवन (३०) व नवनाथ मच्छिंद्र वाघ (४०) यांनी मद्यधुंद अवस्थेत महिलेच्या घरात घुसून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. 

महिलेच्या नातेवाईकांनी आरडाओरडा केल्याने नागरिक जमा झाले. अत्याचार करणाऱ्या नराधमांना त्यांनी चोप दिला. त्रिभुवनच्या डोक्याला जबर मार लागून तो जखमी झाला. 

नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून या दोघांना त्यांच्या हवाली केले. पीडित महिलेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. प्राथमिक तपासणी करून सखोल तपासणीसाठी तिला नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

दरम्यान, ही महिला मतिमंद असल्याने तिला घटनेबाबत काहीच सांगता येत नसल्याने कोपरगाव येथील मूकबधिर विद्यालयातील तज्ज्ञ शिक्षकांकडून तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment