दहशतवाद्यांकडून पोलिसांवर गोळीबार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : जम्मू-श्रीनगर महामार्गावरील एका टोल प्लाजाजवळ शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर दहशतवादी जंगलात पळून गेल्याची माहिती मिळत आहे

https://twitter.com/ANI/status/1223064815616135168

जम्मू-श्रीनगर राजमार्गावर बन्न टोल प्लाजाजवळ पोलिसांकडून श्रीनगरकडे जाणारा एक ट्रक तपासणीसाठी रोखण्यात आला होता. त्यावेळी ट्रकमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरु केला.

https://twitter.com/ANI/status/1223069658074341381

या घटनेत एक पोलीस जखमी झाला. तर सुरक्षादलाकडून देण्यात आलेल्या प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.मारण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून एके-४७ आणि ग्रेनेड जप्त करण्यात आला आहे.

सुरक्षादलाकडून चार ते पाच दहशतवाद्यांना घेराव घालण्यात आला आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. नगरोटा या भागात शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment