आजीसमोरच तीन वर्षांच्या नातीवर बिबट्याची झडप,रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर आजीजवळ खेळत असलेल्या तीन वर्षांच्या नातीवर बिबट्याने झडप घातली. जवळपासच्या नागरिकांनी या चिमुरडीची सुटका केली, पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. 

ही घटना रात्री ७.४५ च्या सुमारास श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे घडली. गळनिंब येथील ज्ञानेश्वरी नामदेव मारकड ही चिमुरडी अंगणात खेळत होती. तिच्याजवळ आजीही होती. 

आजी आपल्या नातीला उचलून घेणार त्याचवेळी घराच्या पाठीमागून आलेल्या बिबट्याने ज्ञानेश्वरीवर झडप घातली. आजीने आरडओरडा केला, पण तोपर्यंत बिबट्याने या चिमुरडीला उचलून जवळच्या उसाच्या शेतात धूम ठोकली. 

आजीच्या आेरडण्याने जवळपासचे नागरिक जमा झाले. गळनिंब-खंडाळा रस्त्यानजीक ही वस्ती व उसाचे शेत अाहे. काही तरूणांनी उसात मोटारसायकली घातल्या.मोटारसायकलींच्या प्रकाशामुळे बिबट्याने शेतातील विहिरीजवळ ज्ञानेश्वरीला टाकून पळ काढला. 

ज्ञानेश्वरीच्या गळ्याजवळ व चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्याने तिला तत्काळ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment