Ahmednagar NewsAhmednagar South

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने आजी आणि नातीचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील ५५ वर्षीय महिलेसह साडेतीन वर्षांची मुलगी ठार झाल्याची घटना नगर-पुणे रोडवरील कामरगाव शिवारातील स्माईल स्टोन जवळ शुक्रवारी (३१ जानेवारी) रात्री आठच्या सुमारास घडली.

मधुकर ठोकळ (वय ५८, कामरगाव, ता.नगर) हे त्यांची पत्नी आशा मधुकर ठोकळ व त्यांची नात ईशा अमोल ठोकळ यांच्यासह त्यांच्या दुचाकीवरून नगरकडून कामरगावकडे जात होते.

यावेळी स्माईल स्टोनजवळ समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत आशा ठोकळ व ईशा ठोकळ यांचा मृत्यू झाला, तर मधुकर ठोकळ हे किरकोळ जखमी झाले. अपघात होताच अज्ञात वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाले.

घटनास्थळावरील नागरिक मदतीकरिता धावले. त्यांनी जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आशा व ईश ठोकळ मृत झाल्याचे सांगितले. शनिवारी दोघांवर कामरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button