अजित पवार यांच्या निकटवर्तीयाच्या भावाची निर्घृण हत्या !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- खटाव येथील राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे ते भाऊ होते. गावातील शेतातून घरी परतत असताना त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला.

गंभीर जखमी झालेल्या आनंदराव पाटील यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आनंदराव पाटील हे राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते असून ते सकाळी शेतात गेले होते.दुपारी १२ च्या सुमारास आपल्या दुचाकीवरुन ते घराकडे परतत असताना हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले.

आनंदराव पाटील यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

आनंदराव पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान आनंदराव पाटील यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.या हल्ल्याने खळबळ उडाली असून हल्ला करणारे कोण होते हे अद्याप समजू शकले नाही.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment