Ahmednagar NewsAhmednagar SouthPolitics

अडचणीच्या काळात पंकजा मुंडे यांना साथ देऊ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :राजकीय अडीअडचणीच्या काळात आमच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मनापासून साथ देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत राहू. त्यांनी बहीण मानले आहे. त्यामुळे बहिणीचा तालुका प्रेमात व विश्वासात कधीही अंतर पडू देणार नाही, २०१४ ची निवडणूक मी प्रथमच लढवली.

या भागातील मतदारांनी भरभरून मते दिले. मात्र, त्या तुलनेत या भागात विविध विकास कामे करूनही चालू निवडणुकीत काही प्रमाणात या भागातून मतदान कमी झाले. मी मात्र विकासकामात दुजाभाव करणार नाही. यापुढील काळात ही विकास कामे करताना गावागावातील ओढे व नद्यावर बंधारे बाधंण्याच्या कामास प्राधण्य देण्यात येईल, असा विश्वास आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील मालेवाडी येथे ७८ लाख रुपये निधीच्या बंधाऱ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर, पाडुरंग खेडकर, तालुका महिला आघाडी अध्यक्ष काशीबाई गोल्हार, अशोक खरमाटे, गोकुळ दौंड, उपसभापती मनीषा वायकर, सजंय कीर्तने, वामन कीर्तने, बाळासाहेब गोल्हार आदी उपस्थित होते.

आमदार राजळे म्हणाल्या, सत्तेच्या काळात मतदारसघांमध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून विविध कामे केल्याने तालुक्यात पाणीपातळी वाढली. सत्ता असताना निधी आणणे वेगळे आणि सत्ता नसताना निधी मिळवणे वेगळे आहे.पाठपुरावा करून मतदारसंघात निधी आणू. प्रसंगी भाडूंन निधी आणू. मात्र, या भागाच्या विकासात खंड पडू देणार नाही. या वेळी मालेवाडीचे सरपंच पाडुरंग खेडकर यांनी प्रस्ताविक केले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close