धक्कादायक: सीएएफच्या जवानांचा एकमेकांवर गोळीबार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/रायपूर :  सशस्त्र दलाच्या तीन जवानांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार छत्तीसगडमध्ये घडला. या गोळीबारात एका जवानाचा मृत्यू झाला असून  दोघे गंभीर जखमी झाले आहेत. 

याबद्दल सविस्तर माहिती अशी की, बीजापूरच्या फरेसगड येथील सीएएफच्या छावणीत तीन जवानांनी एकमेकांवर गोळीबार केला. जवान दयाशंकर शुक्ला, रविरंजन आणि मोहम्मद शरीफ यांनी एकमेकांवर गोळीबार केला.

गोळीबारात तीनही जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान जवान रविरंजन यांचा मृत्यू झाला. तर दोन जवनांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

या जवानांमध्ये कुठल्या मुद्यावरुन वाद झाला आणि त्यांनी एकमेकांवर गोळीबार का केला, याबाबत सध्या कुठलीही माहिती नाही.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment