हॉटेलमध्ये गळफास घेऊन एकाची आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- निफाड तालुक्यातील कोठुरे येथील व्यक्तीने हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी १२ वाजता येथील बसस्थानकासमोरील हॉटेल हिरामध्ये उघडकीस आली.

धनंजय बाजीराव आभाळे (५५) असे मृताचे नाव आहे. आभाळे यांनी शुक्रवारी हॉटेल हिरामधील रूम घेतली होता. शनिवारी जेवण करून ते रूममध्ये गेले. रविवारी सकाळी वेटरला रूममधून प्रतिसाद मिळाला नाही.

दुपारी पुन्हा दरवाजा वाजवला, तरीही प्रतिसाद न मिळाल्याने कडी तोडण्यात आली. आतमध्ये आभाळे यांनी मफलरने गळफास घेतल्याचे आढळले.

हॉटेल चालक राजेंद्र हिरालाल पवार यांनी शहर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आभाळे यांनी कर्जबाजारीपणातून आत्महत्या केल्याची चर्चा असली, तरी कारण मात्र समजू शकले नाही.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment