धक्कादायक: शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / वर्धा : हिंगणघाट शहरात एका शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधामाला अखेर अटक केली आहे. विक्की नगराळे असे या आरोपीचे नाव असून त्याला वर्धा जिल्ह्यातील टाकळघाट परिसरातून अटक करण्यात आली आहे.

हिंगणघाट शहरात आज (3 फेब्रुवारी) सकाळी साडे सातच्या सुमारास एका शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.  शिक्षिका 20 ते 30 टक्के भाजली असून तिला उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आलं आहे.

शिक्षिका (वय 30) दररोज सकाळी आपल्या शाळेत जात असताना आरोपी तिचा पाठलाग करायचा. आजही शिक्षिका शाळेत जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत होता.

हिंगणघाट शहरातील एका चौकात येताच आरोपीने शिक्षिकेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ  उडाली असून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment