पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यामुळे पतीने केला थेट घरावर बॉम्ब हल्ला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. आपल्या खोलीत पत्नीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यामुळे पतीने थेट घरावर बॉम्ब हल्ला केल्याचं समोर आलं.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.उत्तर प्रदेशातील अयोध्याच्या काशिराम कॉलनीत स्फोट झाल्या असून या स्फोटात दोन लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर श्री राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

याबाबत सविस्तर माहिती अशी कि अयोध्यामधील कांसीराम कॉलनी येथे एका स्कूटरस्वाराल्याने देशी बॉम्बस्फोट घडवला आहे. यात दोन लोक जखमी झाले. हा बॉम्ब पती-पत्नीच्या वादात फेकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पतीने खोलीमध्ये पत्नी आणि तिच्या प्रियकराला नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर त्याचा राग अनावर झाला आणि त्याने थेट घरावर बॉम्ब फेकल्याचं समोर येत आहे.

या संपूर्ण प्रकरणात पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, ती तिच्या पतीपासून विभक्त राहत होती, याचा त्याला खूप राग आला होता. यापूर्वी त्याने अनेकदा पत्नीला जिवे मारण्याची धमकी दिली होती.

शनिवार तो तिच्या घरी गेला असता त्याने खोलीमध्ये पत्नीला आणि तिच्या मित्राला पाहिलं. यानंतर त्याचा पारा चढला आणि त्याने बॉम्ब हल्ला करत त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment