BreakingMaharashtra

‘संजू तू हल्ली बरा बोलतो, येतो का पक्षात? – राज ठाकरे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रकाराला व्यासपीठावरुनच पक्षात येण्याची ऑफर दिली. झील संस्था आणि कार्टुनिस्ट कंबाईन यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी इंक अलाईव्ह या कार्यशाळेचं आयोजन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे आपलं मनोगत व्यक्त करताना व्यंगचित्रकाराला ‘येतो का पक्षात?’ असं म्हणाले आणि सभागृहात एकच हशा पिकला.

संजय बरा बोलतोस, येतो का आमच्या पक्षात, असं म्हणत राज ठाकरेंना त्यांचे मित्र कार्टूनिस्ट कंबाइनचे संजय मिस्त्री यांना मनसेत येण्याचं जाहीर निमंत्रण दिलं.

संजय मिस्त्री यांनी शायरीचा आधार घेऊन कलेचं महत्त्व विषद केलं. राज ठाकरे यांनी संजय मिस्त्री यांच्या मनोगतातील हाच धागा पकडला आणि एकच हशा पिकवला.

मी ग्रॅज्युएट नाही आणि मला आजपर्यंत कुणी डिग्रीही विचारली नाही. जगात शिक्षणाला डिग्री लागते, कलेला लागत नाही. जगात कुठेही बिना डिग्रीचा प्रवास करता येतो, असं राज ठाकरे बोलताना म्हणाले.

दरम्यान, राज्य सरकार ज्यावेळेला चित्रकला हा विषय ऑप्शनला टाकतो त्यावेळी अशा संस्था उभं राहणं महत्त्वाचं असतं. प्रत्येकामध्ये कोणतीना कोँणती कला असते, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button