बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने तरुणीवर फेकला ज्वलनशील पदार्थ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / ठाणे : हिंगणघाट शहरातही एका शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच  बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने तरुणीवर ज्वलनशील पदार्थ फेकण्याचा धक्कादायक प्रकार मिरारोडच्या काशीमिरा परिसरात घडला. 

पीडित तरुणी घरी जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत होता. आरोपी मोटरसायकलवरुन आला आणि त्याने पीडितेवर ज्वलनशील पदार्थ फेकला. त्यानंतर पीडितेने आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

आरोपीने पीडितेवर ज्वलनशील पदार्थ फेकल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. सध्या पीडितेवर भाईंदरच्या पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरु आहे. काशीमिरा पोलिसांनी आरोपीला अटक केल असून पुढील तपास सुरु आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment