Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrime

चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील तीन जणांना अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे व्हिडीओ ( चाइल्ड पोर्नोग्राफी ) , फोटो , मजकूर सोशल मीडियावर टाकून प्रसिद्ध करून व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध सायबर पोलिस घेत आहेत. या गुन्ह्यांत जिल्ह्यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे . त्यात एक इंजिनीअर , साखर कारखान्यातील कर्मचारी , दुकानदाराचा समावेश आहे. 

आरोपींची नावे अशी , केतन बाळासाहेब मुंगसे , वय – २१ , रा . वळदगाव , ता . श्रीरामपूर , सागर सुरेंद्र राऊत , वय – २९ , रा . कुंभारगल्ली , जामखेड , नामदेव तुकाराम शेळके , वय – ५९ , रा . संगमनेर अशी आहेत . सायबर क्राईमचे पो . नि . अरूण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपींना अटक करण्याची कामगिरी झाली. 

फेसबुक व इतर सोशल मीडियावर बालकांच्या लैंगिक शोषणाची माहिती टाकणाऱ्यांची माहिती ‘ एनसीआरबी ‘ ला मिळाली आहे . ही माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयाला देण्यात आली आहे . त्यानुसार 16 जणांविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे . गेल्या आठवड्यात राहुरीतील एक व भिंगारमधील एक अशा दोन तरुणांना अटक करण्यात आली होती. 

आता श्रीरामपूर , संगमनेर , जामखेडमधून तिघांना अटक करण्यात आली आहे . श्रीरामपूरमधून अटक करण्यात आलेला तरुण इंजिनीअर असून एका ठिकाणी नोकरीला आहे . संगमनेरमधून ५९ वर्षीय व्यक्तीला पकडण्यात आले असून , ही व्यक्ती एका साखर कारखान्यामध्ये नोकरीला आहे . तर जामखेडमधील दुकानदाराला पकडण्यात आले असून , त्यांचे मोबाइल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. 

या तिघांना पकडल्यानंतर नेमका कोणता गुन्हा केला आहे , याबाबत तिघांनीही पोलिसांकडे विचारणा केली . त्यांचे नातेवाइक सायबर पोलिस स्टेशनला आले होते . फेसबुकवर लहान मुलांचे अश्लील फोटो , व्हिडीओ टाकल्याबाबत अटक करण्यात आल्याचे आरोपींना सांगण्यात आले . गेल्या आठवड्यात अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close