अहमदनगर ब्रेकिंग : पुणे-नाशिक बायपासवर गोळीबारात व्यापारी ठार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात व्यापारी ठार झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तालुक्यातील घुलेवाडी गावाजवळ घडली. अविनाश सुभाष शर्मा (वय ३६, राहणार गुंजाळवाडी) असे गोळीबारात मरण पावलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

गोळीबाराचे कारण समजू शकले नाही. व्यापारी शर्मा हे मूळचे राजस्थानचे रहिवासी असून घुलेवाडी येथे त्यांचा किचन ट्रॉली व फर्निचरचा व्यवसाय आहे. 

सायंकाळी आपल्या दुकानातून घरी जात असताना माझे घर सोसायटीजवळ पुणे-नाशिक बायपासवर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांच्या उजव्या पायाला गोळी लागून नंतर मांडीतून पोटात शिरल्याने त्यांना तातडीने संगमनेर शहरातील तांबे रुग्णालयात हलवण्यात आले. 

उपचार सुरु असताना त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. वैद्यकीय अधिकारी डॉ. राज म्हस्के यांनी व्यापारी शर्मा मृत झाल्याचे सांगितले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

 

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment